500 रुपयांमध्ये खोली, 50 रुपयांची बिर्याणी…Zomato डिलीव्हरी बॉयने व्हिडिओतून दाखवले मुंबईचे जीवन

500 रुपयांमध्ये खोली, 50 रुपयांची बिर्याणी…Zomato डिलीव्हरी बॉयने व्हिडिओतून दाखवले मुंबईचे जीवन

भारतातील लाखो लोक रोजगारासाठी आपले घर सोडून दुसऱ्या शहरात येतात. त्यातील अनेक लोक मुंबई मायानगरीची वाट धरतात. परंतु मुंबईमध्ये राहणे सोपे नाही. अनेक आव्हानांचा सामना मुंबईत बाहेरुन येणाऱ्या लोकांना करावा लागतो. त्यात मुंबईत निवारासाठी जागा मिळणे एक दिव्यच असते. मुंबईतील या समस्येसंदर्भात एका झोमॅटो बॉयने व्हिडिओ बनवून वास्तव्य समोर आणले आहे. सोशल मीडियावर त्याचा हा इमोशनल व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

50 रुपयांची बिर्याणी

झोमॅटो बॉयने केलेल्या या व्हिडिओची सुरुवात एका लहान खोलीतून होते. तो त्यात दाखवतो 500 रुपये भाडे देऊन तो झोपडीत राहतो. त्या झोपडीपर्यंत पोहचण्यासाठी त्याला लहान, लहान गल्ल्यांमधून जावे लागते. त्यानंतर तो लोखंडाचा दरवाजा दाखवतो. त्या ठिकाणावरुन चढून त्याला वर जावे लागते. त्या ठिकाणी खोलीत असणाऱ्या एका व्यक्तीचा परिचय तो ‘सोनू भैया’ म्हणून करतो. त्यानंतर त्या खोलीची परिस्थिती दाखवतो. तसेच व्हिडिओमध्ये 50 रुपयांची बिर्याणी खाताना तो दिसतो. शेवटी तो म्हणतो, त्याला काही आरोग्याची समस्या आहे. यामुळे त्याला वैद्यकीय उपचारावर खूप खर्च करावा लागतो. तो आपल्या परिवाराकडूनही पैसे मागू शकत नाही. यामुळे त्याला या ठिकाणी संघर्ष करावा लागत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by qb_07 (@qb__.07)

सोशल मीडियावर सल्ले अन् दिलासा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर qb__.07 या आयडीवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. त्याला अडीच लाखापेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे. अनेकांनी त्यावर कॉमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

काही यूजर्स त्याला मॉडलिंग करण्याचा सल्ला देत आहेत. काही जण सर्व ठीक होईल, असा दिलासा मिळवून देत आहे. काही जण मुंबईतील परिस्थिती पाहून त्याला पुन्हा आपल्या घरी परत जाण्याचा सल्ला देत आहेत. थोडा धीर धर, तुला हवे ते मिळेल, असे काही युजर्स त्याला सांगतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;