‘लाडकी बहीण योजने’साठी अजितदादांची मोठी घोषणा, महिलांनो, आता इतक्या कोटीची तरतूद

‘लाडकी बहीण योजने’साठी अजितदादांची मोठी घोषणा, महिलांनो, आता इतक्या कोटीची तरतूद

महायुती सरकारने आता पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील दीड लाखांच्या आतमध्ये उत्पन्न प्रत्येक महिलेला दरमहिना 1500 हजार रूपये मिळणार आहेत. या याजनेची सर्वत्र चर्चा झाली मात्र विरोधकांनी भावांसाठी काही आहे की नाही असं म्हणत सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सरकारने मुख्यमंत्री लाडका भाऊ या योजनेचीही घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सरकार योजना आणत असल्याची टीका विरोधक करू लागलेत. अशातच लाडकी बहीण योजनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

राज्यातील भगिनींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 25 हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 4 लाख 29 हजार अर्ज प्राप्त झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादा बोलले.

ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केलेल्या महिला भगिनींनादेखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येईल. योजनेसाठी प्रत्येक महिन्यात साधारण 3 हजार 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला मिळू शकेल. जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात अर्ज भरण्यासाठी सुविधा करण्यात आली आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवकांना प्रशिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी येत्या २७ जुलै रोजी पुण्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार असल्याने भविष्यातही चांगला रोजगार मिळण्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल. अनेक उद्योगांनी या योजनेसाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली असून प्रशिक्षणार्थीची चांगली कामगिरी असल्यास त्याला कायमस्वरूपी रोजगार देऊ, असंही अजित पवारांनी सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;