अदानींना झेपत नसेल तर…; धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून उद्धव ठाकरे आक्रमक

अदानींना झेपत नसेल तर…; धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून उद्धव ठाकरे आक्रमक

धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. गौतम अदानींना झेपत नसेल तर हे टेंडर रद्द करा आणि दुसऱ्या योग्य व्यक्तीला हे टेंडर द्या, अशी आमची जाहीर मागणी आहे. त्यासाठी पुन्हा ग्बोबल टेंडर मागवा. पण हा मुंबई उध्वस्त करण्याचा डाव, धारावीकरांना उध्वस्त करण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

आमचं सरकार आल्यावर अदानींना दिलेलं टेंडर रद्द करण्याचा मुद्दा आहेच. पण आताच या या सरकारने अदानींचं टेंडर का रद्द करू नये? हा आमचा प्रश्न आहे. धारावीकरांवर अन्याय करून मुंबईची अदानी सिटी आम्ही होऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

धारावीची विकास म्हणजे नेमकं काय? याची तुम्ही व्याख्या आधी सांगा… धारावीचा विकास म्हणजे अदानींचा विकाल नव्हे… धारावीतील लोकांचा विकास व्हायला पाहिजे. तिथल्या लोकांना घरं मिळाली पाहिजेत. जर हे त्या विकासकाला जमत नसेल, तर त्याने थेट सांगावं, की आम्हाला झेपत नाही. नवीन टेंडर काढा. पण त्यासाठी मुंबईची विल्हेवाट लावू नका, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

बातमी अपडेट होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;