काँग्रेसच्या बैठकीतली Inside Story, मुंबईत बड्या नेत्यांमध्ये खल, काहीतरी मोठं घडण्याचे संकेत?

काँग्रेसच्या बैठकीतली Inside Story, मुंबईत बड्या नेत्यांमध्ये खल, काहीतरी मोठं घडण्याचे संकेत?

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा लढाव्यात आणि सर्वाधिक जागांवर जिंकून यावं, असा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. काँग्रेस पक्ष हा राज्यात महाविकास आघाडीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा मिळाव्यात यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार आहे. काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगलं यश आलं आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखली जात आहे. असं असलं तरीही काँग्रेसमध्ये काही समस्या देखील आहेत. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमध्ये क्रॉस व्होटिंग झालेलं बघायला मिळालं. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कोणत्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं हे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी बरोबर हेरलं आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांच्यासह काही महत्त्वाच्या नेत्यांनी या आमदारांची दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर आता कारवाई अटळ आहे. या दरम्यान काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली आहे. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सर्व जिल्ह्याध्यक्षांची बैठक दादर येथील टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर काँग्रेसचे नेते उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय-काय चर्चा झाली, याबाबतची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

काँग्रेसच्या बैठकीत नेमकी काय-काय चर्चा झाली?

  • काँग्रेसच्या आजच्या बैठकीत राज्य सरकारने ज्या काही शासकीय योजना आणल्या आहेत त्याला कसं प्रतिउत्तर देण्यात येणार यासंदर्भात चर्चा झाली. तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षासाठी जी थिंक टँक काम करत आहे, त्यांच्याकडून या शासकीय योजनांना कसं प्रत्युत्तर देण्यात येणार यासंदर्भातील मार्गदर्शन घेण्यात आलं.
  • काँग्रेस पक्षाकडून राज्य सरकारने ज्या काही शासकीय योजना काढण्यात आल्या आहेत त्यासंदर्भातील धसका घेण्यात आला आहे. कारण मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकारकडून एक लाडली बहीण योजना सुरु करण्यात आली होती आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाला लोकसभेत सपाटून मार खावा लागला होता.
  • या बैठकीत आगामी काळात काँग्रेस पक्षाची निवडणुकीत काय रणनिती असेल यासंदर्भात चर्चा झाली आहे.
  • काँग्रेसकडून सर्वाधिक विधानसभेच्या जागांवर महाविकास आघाडीमध्ये दावा करण्यात येणार, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
  • विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई करण्यात येणार आहे. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवरील कारवाईच्या संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. पण केसी वेणुगोपाल यांनी हा निर्णय दिल्लीतून आम्ही घेऊ, असा निर्णय या बैठकीत घेतला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;