Maharashtra Rain: काम असेल तरच घराबाहेर पडा, राज्यात अती मुसळधार पावसाचा इशारा, सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट
राज्यात सर्वत्र मान्सूनने जोर धरला आहे. मुंबई आणि कोकणात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आता राज्यात वादळी वाऱ्यासह अती मुसळधार पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. रायगड, कोल्हापूर आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाची पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे 19-21 जुलै दरम्यान कोकण,पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार-अति मुसळधार पाऊस पडणार आहे.
मुंबईत संततधार पाऊस, पुण्यातही अलर्ट
गुरुवारपासून मुंबईत संततधार पाऊस सुरू आहे. त्यानंतर शुक्रवारी पहाटेपासून मुंबईतील काही भागात मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या मरबार हिल परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, ठाणे या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
लोणावळ्यात मुसळधार पाऊस
लोणावळ्यात गुरुवारी 148 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. लोणावळ्यात रविवारी आणि शनिवारी या दोन दिवस जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर गेली चार दिवस पावसाने दडी मारली होती. त्यानंतर आता गुरुवारी दिवसभर मुसळधार पावसाने चांगली हजेरी लावली.
बातमी अपडेट होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List