IAS puja khedkar : केवळ निलंबन नको, प्रशिक्षणाचा खर्च आणि वेतन देखील वसुल करावे, कोणी केली टीका

IAS puja khedkar : केवळ निलंबन नको, प्रशिक्षणाचा खर्च आणि वेतन देखील वसुल करावे, कोणी केली टीका

ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी अनेक नियमांचा भंग केल्याचे उघडकीस आले आहे. पूजा खेडकर यांच्या संदर्भात नवनवीन माहिती समोर येत आहे. आता पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचं वैद्यकीय प्रमाणपत्र देताना देखील घोटाळा केल्याचे म्हटले जात आहे. तसेच तिने श्रीमंत असताना देखील ओबीसी क्रिमी लेअर श्रेणीचा गैरवापर केल्याचे देखील उघड झाले आहे. आता या संदर्भात तिची आई मनोरमा खेडकर यांना मूळशीच्या एका शेतकऱ्याला पिस्तूलाचा धाक दाखवितानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. त्याच वेळी घरात वडील आणि आजोबा सनदी अधिकारी असताना जातीच्या सवलतीचा लाभ घेतल्याचे देखील उघड झाल्याने खळबळ उडाली होती. अखेर पूजा यांचे प्रशिक्षण थांबवून त्यांना मसूरीला हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पूजा खेडकर यांचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरातील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या आणि आतापर्यंत सर्वात पारदर्शक आणि कोटेकोरपणे होणाऱ्या निवडप्रक्रीयेला या प्रकरणाने मोठा तडा गेला आहे. आतापर्यंत युपीएससी बाबत प्रश्न केले जात नव्हते. परंतू पूजा खेडकरच्या प्रकरणानंतर अशी आणखी देखील प्रकरण पडद्यामागे असतील असे म्हटले जात आहे. आता या प्रकरणात लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीचे ( एलबीएसएनएए ) माजी अध्यक्ष संजीव चोपडा यांनी या प्रकरणात जोरदार टिका केली आहे.

कायद्यानूसार शिक्षा झाली पाहीजे

पूजा खेडकर यांच्यावर केवळ निलंबनाने काही उपयोग होणार नाही. तिच्यावरील प्रशिक्षणाचा सरकारचा झालेला आतापर्यंतचा खर्च आणि वेतन देखील तिच्याकडून वसुल केले गेले पाहीजे असे माजी अध्यक्ष संजीव चोपडा यांनी म्हटले आहे.  त्यांना अशी शिक्षा मिळावी की इतर ट्रेनी  अधिकाऱ्यांनी देखील यातून बोध घ्यायला हवा. या प्रक्रियेत पूजा खेडकर यांना मदत करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना देखील शिक्षा व्हायला हवी. या फसवणूकीत सामील असलेल्या  सर्व अधिकाऱ्यांना कायद्यानूसार शिक्षा झाली पाहीजे अशी मागणी संजीव चोपडा यांनी केली आहे.

संजीव चोपडा यांची मागणी काय ?

केंद्र सरकारच्या तथ्य खोज समितीने ( फॅक्ट फायडिंग कमिटी ) प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेड प्रकरणाची संपूर्ण चौकशी करायला हवी. पूजा खेडकर यांच्या पू्ण्यातील नियुक्तीची चौकशी व्हायला हवी. या प्रकरणात राज्य सरकार चौकशी करीत आहे. खोटे प्रमाणपत्रचे प्रकरण देखील गंभीर आहे.या प्रकरणात केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने एक चौकशी समिती नेमली आहे. या निवडप्रक्रीयेत जर काही दोष असतील तर त्याचा विचार केला पाहीजे. कारण देशाचे भावी अधिकारी घडविणारी या संस्थेचे विश्वासार्हता कायम राखणे ही सर्वाची जबाबदारी आहे.

पूजा खेडकर प्रकरण काय ?

2023 बॅचच्या आयएएस अधिकाऱ्यावर पुणे येथे प्रशिक्षणा दरम्यान आपल्या अधिकारांचा गैरवापर करण्याचा आरोप आहे. पूजा खेडकर यांनी आपल्या ऑडी कारला बेकायदेशीपर पणे प्रशिक्षण सुरु असतानाच लाल दिवा लावण्याने त्या सर्वात आधी वादात सापडल्या. त्या ओबीसी संवर्गातील असल्या तरी त्यांनी क्रिमीलेअर उमेदवार EWS सवलतीचा आधार घेतला. त्यांचे वडील माजी सनदी अधिकारी असून त्यांनी वंचित मार्फत निवडणूक लढविताना आपले उत्पन्न 40 कोटी असल्याचे शपथपत्र दिल्याने त्यांचे भांडे उघडे पडले. त्यांचे आजोबा देखील आयएएस होते. त्यांनी अपंगत्वाचा बनावट दाखला देखील दिल्याचे म्हटले जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;