लिफ्ट घेऊन वांद्रे-वरळी सी लिंकवर उतरले, बाबा मुलाशी व्हिडिओ कॉलवर बोलले आणि….मन सुन्न करणारी घटना
वांद्रे-वरळी सी लिंकच्या टोल प्लाझावर त्यांनी दक्षिण मुंबईला जायचय सांगून एका वाहन चालकाकडे लिफ्ट मागितली. आपली कार बंद पडलीय, लवकर पोहोचायचय सांगून लिफ्ट घेतली. सी लिंकच्या मध्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी वाहन चालकाला कार थांबवायला सांगितली. गाडीतून उतरले. पुढे काहीतरी अघटित घडेल, असं वाहन चालकाच्या मनात सुद्धा आलं नाही. त्याने फक्त सूचना ऐकली. तो गाडी घेऊन पुढे निघून गेला. गाडीतून उतरलेल्या व्यक्तीने व्हॉट्स एपवरुन 22 वर्षाच्या मुलाला व्हिडिओ कॉल केला. आपण आयुष्य संपवत आहोत, याची त्यांनी मुलाला कल्पना दिली.
त्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाइल स्विच ऑफ झाला. वांद्रे-वरळी सी लिंकवरुन उडी मारुन त्यांनी आपलं जीवन संपवलं. मनाला चटका लावणारी ही घटना बुधवारी दुपारी 3.15 वाजता घडली. भावेश सेठ असं मृत व्यक्तीच नाव आहे. ते 56 वर्षांचे होते. तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर फायर ब्रिगेडने त्यांचा मृतदेह शोधून काढला. बिझनेसमध्ये नुकसान झाल्याने भावेश विवंचनेत होते. त्यातून त्यांनी हे टोकाच पाऊल उचलल्याची शक्यता आहे.
कुटुंबासाठी मोठा धक्का
भावेश सेठ यांच्या मुलाने संध्याकाळी 4.30 वाजता वांद्रे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सी लिंक आणि टोल प्लाझाच सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यात सेठ गाडीमध्ये बसल्याच आणि सी लिंकवर उतरल्याच दिसलं. भावेश सेठ रहायला घाटकोपरला होते. त्यांच्या मुलाने सांगितलं की, “वडिल नेहमी प्रमाणे दक्षिण मुंबईतील कार्यालयात जाण्यासाठी निघाले. त्यांच्या वर्तनावरुन ते तणावाखाली आहेत, असं अजिबात वाटलं नाही” या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List