या तारखेपासून मुंबईतील पहीली अंडरग्राऊंड मेट्रो धावणार, विनोद तावडे यांनी केले ट्वीट
मुंबईतील पहीली भूयारी रेल्वे लवकरच सुरु होत आहे. कुलाबा ते सिप्झ व्हाया बीकेसी अशा भूयारी मेट्रोचा पहिला टप्पा येत्या 24 जुलै रोजी सुरु होणार असल्याचे भाजपा नेते विनोद तावडे यांनी ट्वीट केले आहे. एक्स माध्यमावर विनोद तावडे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे त्यात ही आनंदाची बातमी मुंबईकरांसाठी दिली आहे. या त्यांच्या एक्स (आधीचे ट्वीटर ) अकाऊंटवर मुंबईची पहीली भूमिगत मेट्रो ( (Aqua Line ) 24 जुलै पासून सुरु होत आहे. या शहराच्या वेगाला या मेट्रोमुळे नवा आयाम मिळणार असल्याचे विनोद तावडे यांनी म्हटले आहे.
विनोद तावडे यांचे ट्वीट येथे पाहा –
प्रधानमंत्री @NarendraModi जी ने मुंबई वासियों के जीवन को सुगम बनाने की गारंटी दी थी, जो पूरी होने जा रही है।
मुंबई की पहली भूमिगत मेट्रो (Aqua Line) 24 जुलाई से शुरू हो रही है , जो शहर की रफ्तार को नई उड़ान देगी। pic.twitter.com/0YgepYbiHw
— Vinod Tawde (@TawdeVinod) July 17, 2024
मुंबईतील मेट्रो – 3 हा कुलाबा – बीकेसी – सिप्झ असा 33 किमीचा भूयारी मार्ग आहे. या मेट्रोचा पहिला बीकेसी ते आरे असा टप्पा तयार असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 24 जुलै रोजी होत आहे.
मुंबई मेट्रो तीनची आरडीएसओची ट्रायल 24 जून रोजी पार पडली होती. या मेट्रोचा बीकेसी ते आरे कॉलनीचा पहिला टप्पा आता प्रवाशांच्यासाठी खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मेट्रो तीनचा मार्गिकेसाठी आरे कॉलनीतील कारशेडचा मुद्दा चांगलाच वादात सापडला होता. या पर्यावरणवादी तसेच कोर्टात प्रकरण गेल्यानंतर आणि कोरोना साथ या अनेक अडचणींमुळे कारशेड उभारण्यासाठी बराच वेळ खर्ची पडला. त्यामुळे इतक्या संकटातून मुंबईची मेट्रो तीन हा भूयारी मेट्रोचा पर्याय मुंबईकरांना आता मिळणार आहे. त्यामुळे आतापर्यंत रेल्वे आणि मेट्रोशी कनेक्टेट नसलेला भाग प्रथमच मेट्रो मार्गिकांशी जुळला जाणार आहे. भूयारी मार्गिकेत एकूण 27 स्थानके आहेत.
भूयारी मेट्रो चाचणीचा व्हिडीओ येथे पाहा –
#MMRC has successfully completed Research Designs and Standards Organisation #RDSO trials of Rolling Stock for #MetroLine3. Testing of other electrical systems and integrated testing of Rolling Stock with signaling is in progress. After completion of testing, the Commissioner of… pic.twitter.com/GnH51CfQIU
— MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) June 24, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List