आषाढीसाठी पंढरपूर जाणाऱ्या भाविकांची बस दरीत पडली, पाच भाविकांचा मृत्यू

आषाढीसाठी पंढरपूर जाणाऱ्या भाविकांची बस दरीत पडली, पाच भाविकांचा मृत्यू

मुंबई-पुणे महामार्गावर सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. पंढरपूरकडे जाणारा ट्रॅव्हल्स बस मागून ट्रॅक्टरला आदळून दरीत कोसळली. या बसमध्ये 54 प्रवासी होते. या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला. डोंबिवलीकडून पंढरपूरला यात्रेसाठी जात होते. पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. मध्यरात्री एकच्या दरम्यान ही घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटेच्या वेळी अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यानंतर बस 20 फूट खाली दरीत कोसळली.

असा झाला अपघात

अपघातासंदर्भात नवी मुंबईचे डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले की, सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर अपघात झाला. एका खासगी बसमधून 54 जण आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात होते. प्रवाशांनी भरलेली ही बस ट्रॅक्टरला धडकली. त्यानंतर बस दरीत पडली. अपघातात जखमी झालेल्या 42 जणांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे, तर इतर तीन जणांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मृतांची संख्या वाढली

भाविकांनी भरलेली बस डोंबिवलीतील केळझर गावातून पंढरपूरला जात होती. मुंबई एक्स्प्रेस हायवेजवळ या बसने एका ट्रॅक्टरला धडक दिली. त्यावेळी घटनास्थळी चार जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आणखी एका जणाचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

१७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यासाठी विठ्ठरुयाचे दर्शन घेण्यासाठी भाविक जात होते. परंतु काळाने पाच प्रवाशांना दर्शन घेऊ दिले नाही. आषाढी एकादशीला राज्यभरातून वारकरी दिंडीद्वारे पंढरपूरला जात असतात. ज्यांना दिंडीने जाणे शक्य होत नाही, ते भाविक बस आणि रेल्वेने पंढरपूर गाठतात. लाखोंची गर्दी आषाढीला पंढरपूरला होत असते.

दुसऱ्या अपघातात तरुणाचा मृत्यू

नाशिक मुंबई महामार्गावर वैतरणा फाट्याजवळ भरधाव कंटेनरची मोटरसायकलने धडक दिली. या अपघातात कंटेनर मोटरसायकलस्वाराच्या डोक्यावरून गेल्याने मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. योगेश मदन परदेशी (वय ३०, राहणार खालची पेठ इगतपुरी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाला त्या ठिकाणी पुलाचे काम चालू आहे. जागीच वळण आणि उतार आहे. त्या ठिकाणी दिशादर्शक फलकही नाही व मोठ्या प्रमाणत अंधार आहे. कंटेनर चालकाला घोटी पोलिसांनी घेतले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;