Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विखेंमुळे निलेश लंके गेले, अजित दादांचे मोठे दावे, पाहा Video

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विखेंमुळे निलेश लंके गेले, अजित दादांचे मोठे दावे, पाहा Video

लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकांचे सर्व्हे येवू लागल्यानंतर अजित पवार गटानंही 288 जागांवर सर्व्हे करण्याचा निर्णय घेतलाय. अजित पवारांनी आपल्या नेत्यांसोबत औपचारिक गप्पा केल्या., आणि त्यात सध्या चर्चेत असलेल्या दैनिक सकाळच्या सर्व्हेवरही चर्चा झाली. सकाळच्या सर्व्हेनुसार राज्यात महाविकास आघाडीला 152 तर महायुतीला 136 जागा मिळतील.,
यात काँग्रेसला 67, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 41 आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 31 जागा तर महायुतीत भाजपला 95, शिंदेंच्या शिवसेनेला 27 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 18 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेलाय.

अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांना दोन मोठे दावेही केले., त्यानुसार जर भाजपनं नगर आणि माढाची जागा आम्हाला सोडली असती. तर निलेश लंके आणि धैर्यशील मोहिते आमच्याकडूनच निवडणूक लढवून विजयी झाले असते. मात्र भाजपच्या राधाकृष्ण विखेंनी त्रास दिल्यामुळेच निलेश लंके शरद पवारांकडे गेल्याचा दावाही अजित पवारांनी केला.

पाहा व्हिडीओ:-

अजितदादा म्हणाले की, नगर लोकसभा निलेश लंके महायुतीकडून लढण्यास तयार होते. दक्षिण नगरमधून लंके आणि माढ्यातून धैर्यशील मोहिते निवडणूक लढणार होते पण भाजपनं दोन्ही जागा आम्हाला सोडल्या नाहीत. पालकमंत्री विखे पाटलांनी खूप त्रास दिल्यानं निलेश लंके मविआकडे गेले. लंकेंच्या मित्रांच्या खडी क्रॅशर कंपन्यांना मोठ्या प्रमाणात टॅक्स लावला गेला. विधानसभेसाठी अजित पवार गट 288 जागांचा सर्व्हे करणार आमच्या 54 जागा आहेतच, आणखीही जागा मागणार ,विधान परिषद निवडणुकीत आमदारांना कोणतीही प्रलोभनं दिली नाहीत.

माझ्यासोबतचे सध्याचे आमदार माघारी गेले तरी हरकत नाही, नव्या लोकांना संधी देऊ. धाराशिवची जागा लढायची नव्हती, पण ती जागा आम्हाला घ्यायला लावली रायगड लोकसभा मतदारसंघात आम्हाला भाजपची मतं मिळाली त्यामुळे मतं ट्रान्स्फर होत नाहीत असं म्हणणं चुकीचं असून आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही अशीच परिस्थिती असेल, असा विश्वास अजित पवारांनी वर्तवलाय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;