मोठी बातमी : महाराष्ट्रातील महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल 14,690 पदांसाठी भरती

मोठी बातमी : महाराष्ट्रातील महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल 14,690 पदांसाठी भरती

महायुती सरकर महिलांसाठी अनेक नवनवीन योजना आणत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची राज्यात चर्चा असताना महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्रातील महिलांना नोकरीची सुवर्णसंधी दिली आहे. आदिती तटकरेंनी अंगणवाडी मदतनीसांच्या भरतीची घोषणा केली असून 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असणार आहे.

 

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत भरण्याच्या सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर दिल्या आहेत. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. इच्छुक महिलांनी अर्ज करावा, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ मध्ये महिलांना दर महिना 1500 रूपये बँकेच्या खात्यावर जमा होणार आहेत. राज्य सरकारकडून थेट महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकले जाणार आहेत. मात्र काही महिलांना बँकेमध्ये खाते नसल्याने त्यांना अडचण येते आहे. याच पार्श्वभूीवर ज्या महिलांची अजुनही बँक खाती नाहीयेत त्यांना सहकार्य करत बॅकांना खाते उघडून देण्यासाठी सहकार्य करावी आणि तसे आदेश बँकांना महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेत.

बँकेमध्ये फक्त तुमचे खाते असून चालणार नाहीतर त्यासाठी तुम्ही केवायसी करणही गरजेच आहे. त्यासोबतच खाते आधारकार्डसोबत जोडलेलं हवं. तरंच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;