काल बारामतीतून निशाणा आज भेट; शरद पवार-छगन भुजबळ भेटीची मोठी कारणं

काल बारामतीतून निशाणा आज भेट; शरद पवार-छगन भुजबळ भेटीची मोठी कारणं

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी जात छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांच्या आजच्या नियोजित कार्यक्रमात छगन भुजबळ यांच्या भेटीचा उल्लेख नव्हता. ही भेट नियोजित नव्हती. त्यामुळे छगन भुजबळ यांना पवारांच्या भेटीसाठी वाट पाहावी लागली. त्यानंतर शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. जवळपास दीड तास वाट पाहिल्यानंतर छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट झाली. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली? याबाबत राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य लोकांमध्येदेखील उत्सुकता आहे.

भुजबळांची नाराजी

लोकसभा निवडणुकीला छगन भुजबळ हे नाशिकमधून महायुतीचे उमेदवार असतील अशी शक्यता होती. मात्र शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर छगन भुजबळ नाराज झाल्याची चर्चा रंगली. राज्यसभेला छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाणार आणि त्यांना केंद्रात मंत्रिपदही दिलं जाणार असल्याची चर्चा रंगली. मात्र बारामतीतून पराभूत झालेल्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली . या सगळ्यानंतर भुजबळांच्या मनात खदखद आहे. ते नाराज आहेत, अशी चर्चा आहे. या मुद्द्यावर छगन भुजबळांनी शरद पवारांशी चर्चा केली असण्याची शक्यता आहे.

आरक्षणाचा मुद्दा

ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. या दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झालाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील विरूद्ध छगन भुजबळ असा संघर्ष सातत्याने पाहायला मिळतोय. या प्रश्नावर तोडगा काढणं आवश्यक आहे, या मुद्द्यावर छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केलेली असू शकते.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

छगन भुजबळ हे भेटायला गेलेत याची मला माहिती नाही. आज त्यांनी वायबी सेंटरला वेळा दिली नव्हती. आज ते सिल्वर ओकवर असतील काय होतंय हे माहिती नाही. आम्ही जर तर वर राजकारण करत नाही. आम्ही खूप गांभीर्याने राजकारण करतो. आम्ही कोणा व्यक्तीसाठी राजकारण करत नाही लोकांसाठी आम्ही राजकारण करतो. भुजबळांची महायुतीत हेळसांड होतेय, याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीत कोण येणार हा संघटनेतला निर्णय असेल. कोणी व्यक्ती तो निर्णय घेणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;