सर्वपक्षीय भेटीला का गेले नाही?, शरद पवार यांनी फोडलं राज्य सरकारवर खापर; छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
ओबीसी आणि मराठा आरक्षण प्रश्नी बोलवण्यात आलेल्या बैठकीला विरोधी पक्षांचे आमदार उपस्थित नव्हते. याच मुद्द्यावर काल बारामतीत बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली होती. बारामतीतून सर्व पक्षीय बैठकीला न जाण्याचा आदेश आला होता. असं छगन भुजबळ काल बारामतीत म्हणाले होते. त्यानंतर आज भुजबळांनी पवारांची भेट घेतली. तेव्हा शरद पवार यांनी सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहण्याचं कारण सांगितलं. मनोज जरांगे पाटील, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यासोबत सरकारच्या प्रतिनिधींच्या झालेल्या बैठकींचा पवारांनी यावेळी उल्लेख केला.
पवारांनी ‘तो’ मुद्दा उपस्थित केला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांना भेटले. त्यांनी काय चर्चा केली? काय आश्वासने दिली, हे आम्हाला माहीत नाही, असं शरद पवार म्हणाले. तुम्ही लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सोडवायला गेला तुम्ही त्यांना काय सांगितलं माहीत नाही, असं शरद पवार मला म्हणाले. वातावरण शांत राहावा. हा माझा हेतू आहे. त्यात कोणतंही राजकारण नाही, असं पवार म्हणाल्याचं छगन भुजबळांनी सांगितलं.
भेटीत पवार काय म्हणाले?
वातावरण शांत राहावा. हा माझा हेतू आहे. त्यात कोणतंही राजकारण नाही. पवार म्हणाले. मीडियाला सांगा राजकारण आणणार नाही. केवळ सामाजिक प्रश्न म्हणून दोन चार लोकांबरोबर चर्चा करू. दीड तास चर्चा झाली. कुठे काय काय झालं हे सांगितलं. वकील काय म्हणतात ते सांगितलं. धनगरांच्या प्रश्नावरही चर्चा केली. त्यांनी काही सूचना दिल्या. साधकबाधक चर्चा झाली. पवार चर्चेला तयार आहे. ओपनमध्ये चर्चा होणं कठिण आहे. त्यामुळे दोन चार लोकांमध्ये चर्चा करणार. प्रश्न सुटण्याआधी अवघड होतात. म्हणून आम्ही आधीच समजून घेतो असं पवारांनी म्हटल्याचं छगन भुजबळ म्हणाले.
आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही. मी सभागृहातील गोष्टी भाषणात बोललो. मी परत सांगतो. मला राजकारणाची पर्वा आहे,. ना मंत्रीपदाची, ना आमदारकीची. राज्य शांत राहिलं पाहिजे. गोरगरीबांमध्ये दुफळी होऊ नये हे माझं मत आहे. त्यामुळे मी ओपनमध्ये बोलतो आणि साहेबांकडेही बोलतो. या प्रश्नावर मी कुणाच्याही घरी जायला आणि कुणाशीही भेटायला मला कमीपणा वाटत नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List