मराठा-ओबीसी वाद सोडवण्यासाठी शरद पवार घेणार पुढाकार, ठरावीक नेत्यांशीच होणार चर्चा; भुजबळांच्या प्रयत्नांना यश

मराठा-ओबीसी वाद सोडवण्यासाठी शरद पवार घेणार पुढाकार, ठरावीक नेत्यांशीच होणार चर्चा; भुजबळांच्या प्रयत्नांना यश

राज्यात ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात आरक्षणावरुन वाद सुरु आहे. हा वाद मिटवण्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी कंबर कसली आहे. रविवारी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केल्यानंतर सोमवारी त्यांच्या निवासस्थानी छगन भुजबळ पोहचले. त्यानंतर राज्यातील वाद मिटवण्यासाठी आता तुम्हीच पुढाकार घ्या, असे साकडे शरद पवार यांना घातले. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर विद्यापीठाच्या नामांतर प्रश्नी राज्य पेटले असताना, शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेची भुजबळ यांनी आठवण करुन दिली. या चर्चेत शरद पवार यांनी हा वाद सोडवण्यासाठी पुढाकर घेण्याचे मान्य केले. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर ठरवीक नेत्यांना सोबत घेऊन या प्रश्नावर मार्ग काढणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. यामुळे राज्यातील आरक्षणाचे वादळ शांत होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हा राजकारणाचा विषय नाही…

राज्यातील ओबीसी-मराठा पेटलेला वाद हा राजकारणाचा विषय नाही. मी सभागृहातील गोष्टी भाषणात बोललो. मी परत सांगतो. मला राजकारणाची पर्वा आहे. ना मंत्रीपदाची, ना आमदारकीची. राज्य शांत राहिले पाहिजे. गोरगरीबांमध्ये दुफळी होऊ नये हे माझे मत आहे. त्यामुळे मी ओपनमध्ये बोलतो आणि साहेबांकडेही बोलतो. या प्रश्नावर मी कुणाच्याही घरी जायला आणि कुणाशीही भेटायला मला कमीपणा वाटत नाही.

कोणते नेते असू शकतात…

आज शरद पवार यांची भेट घेणार असल्याबाबत आपण पक्षात कुणाशी चर्चा केली नाही. फक्त प्रफुल्ल पटेल यांना फोन करून सांगितले. कोणत्या विषयावर चर्चा करणार आणि काय कागदपत्रे देणार आहे, हे पटेल यांना सांगितले.

शरद पवार यांनी चर्चेत सर्व पक्षातील ठरावीक नेत्यांशी सोबत घेणार असल्याचे सांगितले. त्यात सीएम असतील. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार किंवा प्रफुल्ल पटेल असतील. सुधीर मुनंगटीवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे असू शकतील. पवारांनी याबाबत आग्रह धरावा हे माझे म्हणणे आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;