काल मोठा आरोप, आज भुजबळ अचानक भेटीसाठी सिलवर ओकवर, शरद पवार गटातील नेत्याच म्हणण काय?

काल मोठा आरोप, आज भुजबळ अचानक भेटीसाठी सिलवर ओकवर, शरद पवार गटातील नेत्याच म्हणण काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली. अजित पवार गटात असलेले छगन भुजबळ आज अचानक शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिलवर ओकवर दाखल झाले. कालच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर आज भुजबळ अचानक सिलवर ओकवर पोहोचले. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. शरद पवार यांनी बारामती येथून फोन केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला, असा दावा छगन भुजबळ यांनी केला होता. छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या या भेटीवर पवार गटातील विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला आल्याच मला तुमच्या चॅनलवरुन कळलं. अनेक जण पवारांच्या भेटीला येत असतात, भुजबळ बाहेर आल्यावरच नेमकं काय ते समजू शकतं. सध्या, तरी कळायला मार्ग नाही. सुनील तटकरे, अजित पवार हे मोठे नेते शरद पवारांवर टीका करायच टाळतात. त्यांना काही बोलायच असेल, तर भुजबळांकडून बोलवून घेतात लोकसभेपासून छगन भुजबळ नाराज दिसतायत. त्यांच्याकडून टीका करुन घेतली जाते का? असा मला प्रश्न पडतो. अनेक लोक शरद पवारांना भेटायला येतात, तसेच भुजबळ भेटायला आले असतील” असं विद्या चव्हाण म्हणाल्या.

भेटीमागे ओबीसी, मराठा आरक्षणाचा मुद्दा का?

सध्या राज्यासमोर ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, संवादाची दरी मिटवण्यासाठी ही भेट आहे का? यावर विद्या चव्हाण म्हणाल्या की, “मंडल आयोगाच 27 टक्के आरक्षण पवार साहेबांच्यावेळी पहिलं महाराष्ट्रात लागू झालं. ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी शरद पवार प्रयत्नशील आहेत. आरक्षणाची मर्यादा 50 टक्केच्या वर वाढवण्यासाठी संसदेत गेलं पाहिजे. मुख्यमंत्री शिंदे दाखवतायत की, ते आरक्षणाचा पेच सोडवण्याचा प्रयत्न करतायत. पण मिटिंगला जाऊन वेळ वाया घालवण्यात काय उपयोग?. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घ्यावी”

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;