चला दर्शनाला जाऊ… मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा जीआर निघाला, नियम आणि अटी काय? जाणून घ्या प्रक्रिया
राज्य सरकार आता जनतेला देव दर्शन घडविणार आहे. पात्र व्यक्तीच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे. केवळ राज्यातीलच नाही तर पर राज्यातील तीर्थ स्थळांना जाता येईल. या महत्वाच्या योजनेची घोषणा केल्यानंतर तिच्याविषयी भाविकांमध्ये मोठी उत्सुकता होती. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु झाली आहे. या योजनेचे शासकीय परिपत्रक (GR) निघाला आहे. त्यात या योजनेच्या अटी, शर्ती, नियम वय आदींची इत्थंभूत माहिती जीआरमध्ये देण्यात आली आहे.
राज्यातील 66 तीर्थक्षेत्राचा समावेश
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत राज्यातील एकूण 66 तीर्थक्षेत्राचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये सिद्धविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, चैत्यभूमी, माऊंट मेरी चर्च, मुंबादेवी, वाळकेश्वर मंदिर, गोराई येथील विश्व विपश्यना पॅगोडा, शिर्डीचे साई मंदिर, पंढरपूरसह राज्यातील अनेक मोठ्या स्थळांचा समावेश आहे.
परराज्यातील तीर्थक्षेत्रांचा समावेश
यासोबतच इतर राज्यातील , जम्मू काश्मीर, दिल्ली, उत्तराखंड, झारखंड, उत्तरप्रदेश, ओरिसा, बिहार, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, या राज्यातील प्रमुख देवस्थानांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे.
पात्र व्यक्तीची निवड
सदर योजनेवर अंकुश ठेवण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय समिती संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आहे. ही समिती याविषयीच्या अर्जाची छाननी करुन पात्र व्यक्तीची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल.
काय आहेत अटी आणि शर्ती
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 60 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.
निर्धारित तीर्थस्थळापैकी एका तीर्थस्थळाला भेट देण्याचा यात्रेकरूंना अधिकार
प्रवास खर्चाची प्रतिव्यक्ती मर्यादा 30 हजार कमाल आहे.यामध्ये भोजन निवास इत्यादी बाबींचा समावेश आहे.
लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.
या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार आहेत अशा कुटुंबांना यामध्ये लाभ मिळणार नाही.
ट्रॅक्टर वगळून इतर चार चाकी वाहन असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List