Mihir Shah : वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शहाचा अजून एक ‘कारनामा’; पोलिसांनीच केला धक्कादायक खुलासा

Mihir Shah : वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शहाचा अजून एक ‘कारनामा’; पोलिसांनीच केला धक्कादायक खुलासा

मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणात मुख्य आरोपी मिहीर शहा याचा अजून एक कारनामा समोर आला आहे. त्याने या गुन्ह्यात वापरलेल्या कारबाबत पोलिसांनीच धक्कादायक खुलासा केला आहे. दरम्यान मिहीर शहाचा चालक परवाना रद्द करण्यासाठी मुंबई पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालयाला, आरटीओला पत्र पाठवणार असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आता एका मागून एक खुलासे समोर येत आहेत.

भरधाव कार चालविल्याने कापले चलन

वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शहाने गुन्ह्यात वापरलेल्या कारबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मिहीरने गुन्ह्यांत वापरलेल्या कारवर या आधीही पोलिसांनी दोनवेळा कार भरधाव वेगात चालवल्या प्रकरणी चलन कापल्याचे समोर आले आहे.

२३ फेब्रुवारी रोजी खालापूर टोल नाक्याजवळील सीसीटीव्हीत ही कार भरधाव वेगातने जात असल्याचे कैद झाले आहे. यावेळी त्या मार्गावरील वेग मर्यादा ही १०० असताना, गाडीचा वेग मात्र ताशी १११ किमी इतका होता. त्यावर महाराष्ट्र पोलिसांनी २ हजारांचं चलन कापले होते.

तर ७ नोव्हेंबर २०२३ रोजी पनवेल येथील टोल नाक्यावर ८० किमीची वेगमर्यादा असताना. गाडीचा वेग मात्र ८८ किमी इतका होता. त्यानुसार गाडीवर २००० रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. या शिवाय त्या गाडीवर धोकादायक परिस्थितीत गाडी रस्त्यावर उभी केल्याप्रकरणी ५०० रुपयांची दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.

अपघातावेळी पण कार भरधाव

तपासात ज्यावेळी हा अपघात घडला, त्यावेळीही गाडी भरधाव वेगात असल्याचे निरीक्षण तपास अधिकाऱ्यांनी नोंदवलं आहे.तर गाडीचा इन्शूरन्स हा १६ मे २०२४ मे रोजी संपला असल्याची माहिती समोर येत आहे.या कारचे मूळ मालक हे राजेश दोषी नावाची व्यक्ती असून त्याच्याकडून मिहीर शहानं ही गाडी विकत घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मात्र अधिकृतरित्या मिहीरनं गाडी विकत घेतली आहे का? त्याबाबत काही कागदोपत्री व्यवहार केला आहे का ? याचाही तपास पोलिस करत आहे. प्रथम दर्शनी या तीनही चलनाची रक्कम ही अद्याप भरलेली नसून गाडीवर ४ हजार ५०० इतकी दंडात्मक रक्कम भरणे बाकी असल्याचे निदर्शनास येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;