महाराष्ट्राला जगातील सर्वात मोठं आर्थिक पॉवर हाऊस बनवणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा
महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार म्हणत मोदींनी भाषणाला सुरूवात केली. आज मला महाराष्ट्र आणि मुंबईसाठी ३० हजार कोटीचे प्रकल्पाचा शिलान्यास आणि लोकापर्पण करण्याची संधी मिळाली आहे. या प्रकल्पामुळे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराची कनेक्टिव्हिटी चांगली होईल. यात रोड आणि रेल्वे शिवाय राज्यातील तरुणांच्या कौशल्यविकासाच्या योजनाही सामील आहेत. यात राज्यात मोठ्या संख्येने रोजगाराची निर्मिती होणार आहे. तुम्ही पेपर पाहिले असतील, दोन तीन आठवड्यापूर्वीच केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी वधावन बोर्डलाही स्वीकृती दिली आहे. 76 हजार कोटी रुपये या प्रकल्पाने राज्यात 10 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होईल, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
गेल्या एक महिन्यापासून मुंबई देश विदेशातील गुंतवणूकदारांच्या उत्सवाची साक्षीदार बनली आहे. छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांनी आपल्या सरकारच्या तिसऱ्या टर्मचं उत्साहाने स्वागत केलं आहे. एनडीए सरकारच स्थिरता देऊ शकते, स्थायीत्व देऊ शकतं हे लोक जाणून आहे. तिसऱ्या टर्ममध्ये एनडीए सरकार तीनपट वेगाने काम करेल असं मी सांगितलं होतं. आज ते आपण होत असलेलं पाहत असल्याचं मोदी म्हणाले.
राज्याकडे गौरवशाली इतिहास आहे. राज्याकडे सशक्त वर्तमान आहे. आणि राज्याकडे समृद्धी भविष्याचं स्वप्न आहे. विकसित भारताच्या निर्मितीत मोठं योगदान असलेलं राज्य आहे. राज्याकडे इंडस्ट्रीची पॉवर आहे, कृषी पॉवर आहे, राज्याकडे आर्थिक सेक्टरची ताकद आहे. या ताकदनेच मुंबईला देशाचा फायनान्शियल हब केलं आहे. आता महाराष्ट्राला जगातील सर्वात मोठा आर्थिक पॉवर हाऊस बनवण्याचं माझं लक्ष असल्याची घोषणा मोदींनी केली.
माझं ध्येय मुंबईला जगाची थिंक टॅक कॅपिटल बनवायची आहे. महाराष्ट्र टुरिझममध्ये भारतातील नंबर वन राज्य बनावं. या ठिकाणी शिवाजी महाराजांचे शौर्याचे साक्षी किल्ले आहेत. इथे सह्याद्रीच्या रांगा आहेत. कोकणातील अथांग समुद्र आहे. कॉन्फरन्स टुरिझम आणि मेडिकल टुरिझमची शक्यता आहे. भारतात विकासाची नवी गाथा लिहिण्याचं काम महाराष्ट्र करत आहे. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, हा कार्यक्रम हेच ध्येय गाठण्यासाठी आहे, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List