Imd alert : मुंबई आणि रायगड जिल्ह्यात पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Imd alert : मुंबई आणि रायगड जिल्ह्यात पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईकरांसाठी पुढील तीन तास महत्वाचे आहेत. भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे मुंबईतील नागरिकांनी काळजी घ्यावी असे हवामान विभागाने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात 8 जुलै रोजी मुंबईत अति मुसळधार पाऊस कोसळला होता. आता पुन्हा हा विकेण्ड देखील हवामान विभागाने काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

मुंबईत कालपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईतील लोकल ट्रेन 8 जुलैच्या पावसात मध्य रेल्वेच्या कसारा-खडवली परिसरात नदीला पुर आल्याने वाहतूकीचे तीन तेरा वाजले होते. यावेळी नवीनच ठिकाणी पाणी रुळांवर आल्याने मध्य रेल्वेचे अधिकारी चक्रावले आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर येथे नदीला पुर आल्याने पुरात अडकली होती. त्यावेळी नेव्हीला मदतीसाठी पाचारण करावे लागले होते. यंदा देखील लांबपल्ल्याची मुंबईत येणारी गाडी रखडली होती. त्यामुळे विधीमंडळ अधिवेशनासाठी मुंबईत येणारे लोकप्रतिनिधी अडकून पडले होते.

भांडुप परिसरात यंदा नवा ब्लॅक स्पॉट

यंदा भांडुप परिसरात प्रचंड पाऊस झाल्याने रुळांवर पाणी आल्याने लोकल खोळबंल्या होत्या. या ठिकाणी कधी पाणी साचल्याचा इतिहास नव्हता. परंतू येथील नालाचे रुंदीकरण पालिकेने रेल्वेला न कळविता केल्याने या ठिकाणी यंदा अधिक पाणी साचल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात नाला रुंदीकरणाचे काम वर्षभरापासून सुरु होते. या कामासाठी पालिकेने रेल्वे शेजारचा रस्ता देखील प्रवाशांसाठी बंद केला होता. तरीही मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना कसे कळले नाही असा सवाल नागरिकांनी केला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये कोणताही समन्वय नसल्यानेच मुंबईकरांना याचा परिणाम भोगावा लागल्याचे म्हटले जात आहे.

नंदूरबारमध्ये पावसाला सुरुवात, बळीराजा सुखावला

नंदूरबार जिल्ह्यात  सकाळपासून सर्वत्र पावसाने हजेरी लावली असून चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात सकाळ पासून सर्वत्र काळोख दाटला असून पावसाने ही हजेरी लावली आहे.पावसाला मोठा जोर नसला तरी सकाळ पासून पावसाची रिपरिप सुरू असून अधून मधून मोठी सर हजेरी लावत आहेत.जिल्ह्यात चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट असून प्रशासनाकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील पावसामुळे शेती कामांना आणखी वेग येणार आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतीचे काम मंदावले होते. मात्र आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली असल्याने खरीप हंगामाच्या पिकांना फायदा होणार. परंतु जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस झाला नसल्याने धरण क्षेत्रांमध्ये अल्पसा पाणीसाठा आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;