पंतप्रधान मोदींचे मिशन विधानसभा ! आज मुंबई दौरा, विविध विकास कामांचे करणार लोकार्पण

पंतप्रधान मोदींचे मिशन विधानसभा ! आज मुंबई दौरा, विविध विकास कामांचे करणार लोकार्पण

लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ( शनिवार 13 जुलै) पहिल्यांदाच मुंबईत येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आज संध्याकाळी होणार आहे. त्यादरम्यान पंतप्रधान मोदी मुंबईला कोट्यवधी रुपयांची प्रकल्पांचे आणि बोगद्याचे उद्घाटनही करतील. लोकमान्य टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवरील नवीन प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करतील. तसेच मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे. तसेच घोषणा होऊन नऊ वर्ष रेंगाळलेल्या ठाणे-बोरिवली जुळ्या बोगद्याच्या प्रकल्पाचे भूमीपूजनही पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी अनेक वेळा महाराष्ट्राचा दौरा केला आहे. आता लोकसभा निवडणुका पार पडल्या असल्या तरी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असून त्या दृष्टीनेच पंतप्रधान सतत महाराष्ट्राचे दौरे करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

कसा असेल दौरा ?

मुंबई दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी प्रथम NESCO प्रदर्शन केंद्रात पोहोचतील, जिथे ते हजारो कोटींच्या प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवतील, त्यानंतर पंतप्रधान मोदी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील INC सचिवालयाला भेट देतील.
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 5:30 वाजता गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात पोहोचतील, जिथे ते मुंबईतील वाहतूक कनेक्टिव्हिटीशी संबंधित प्रकल्पांचे लोकार्पण करतील. रेल्वे, रस्ते आणि बंदर क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांना ते हिरवा झेंडा दाखवतील.

त्यानंतर नवीन INS टॉवर्सचे उद्घाटन करण्यासाठी संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान मोदी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील भारतीय वृत्तसेवा (INS) सचिवालयाला भेट देतील. पंतप्रधानांच्या दौऱ्यात ते अनेक मोठ्या प्रकल्पांना चालना देणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते 16,600 कोटी रुपयांच्या ठाणे-बोरिवली बोगद्याच्या प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे. या बोगद्यामुळे प्रवासाचा सुमारे 1 तासाचा वेळ वाचणार आहे.

प्रशिक्षण योजनाही करणार लाँच

6,300 कोटी रुपयांच्या गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचेही मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. तो गोरेगावमधील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला मुलुंडमधील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जोडेल. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ सध्याच्या 75 मिनिटांवरून 25 मिनिटांवर येणार आहे. तसेच नवी मुंबईत कल्याण यार्ड रीमॉडेलिंग प्रकल्प आणि गती शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल देखील सुरू करणार आहे. आज पंतप्रधान हे 5,600 कोटी रुपयांची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना देखील सुरू करतील. तरुणांची बेरोजगारी दूर करणे आणि 18 ते 30 वयोगटातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;