फाईलमध्ये पैसे ठेवले, भाजप आमदार मेघना बोर्डिकर यांचा व्हिडीओ व्हायरल, नेमका खुलासा काय?

फाईलमध्ये पैसे ठेवले, भाजप आमदार मेघना बोर्डिकर यांचा व्हिडीओ व्हायरल, नेमका खुलासा काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणार असल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे. या निवडणुकीसाठी गेल्या दोन दिवसांपासून हॉटेल पॉलिटिक्स बघायला मिळालं आहे. राज्यातील 4 मोठ्या पक्षांनी विधान परिषद निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी आपापल्या पक्षाच्या आमदारांना मुंबईतील 4 वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवलं होतं. त्यामुळे ही निवडणूक किती प्रतिष्ठेची बनली आहे, याचा प्रत्यय येताना दिसतोय. या निवडणुकीत कोणत्यातरी एका पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित आहे. पण कुणालाही तो पराभव नकोय. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून मतांसाठी जोरदार राजकीय फिल्डिंग लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत मतदान करण्यासाठी भाजपचे जेलमधील आमदार गणपत गायकवाड हे सुद्धा आज विधान भवनात आले. त्यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे ही निवडणूक प्रत्येक पक्षासाठी किती महत्त्वाची आहे ते स्पष्ट होत आहे. एकीकडे विधान परिषद निवडणुकीसाठी या हाय व्होल्टेज घडामोडी सुरु आहेत तर दुसरीकडे विधानसभेच्या सभागृहातला भाजपच्या एका महिला आमदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडीओत नेमकं काय आहे?

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा भरोसा नाही. विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. असं असताना भाजप आमदार मेघना बोर्डिकर यांचा विधानसभेच्या सभागृहातला आजचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भाजप आमदार राजेश पवार हे सभागृहात आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. त्यांच्या पाठीमागे मेघना बोर्डिकर या बसल्या आहेत. राजेश पवार बोलताना पाठीमागे असलेल्या मेघना या एका फाईलमध्ये पैसे ठेवत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. पण त्यांनी फाईलमध्ये पैसे नेमके का ठेवले? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

मेघना बोर्डिकर यांचा खुलासा काय?

दरम्यान, संबंधित व्हिडीओवर मेघना बोर्डिकर यांचा खुलासा समोर आला आहे. “सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधी आणण्यासाठी 1000 रुपये माझ्या PA कडे देण्यासाठी ठेवले होते. ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या PA कडे सभागृहाबाहेर पाठविण्यासाठी दिले गेले. मात्र नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकं करीत आहेत. हा प्रकार अनुचित आहे आणि सभागृहाचे पावित्र्य जपणारा नाही. माझी माध्यमांनाही विनंती आहे की, बातम्या देताना किमान संबंधितांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे”, अशी प्रतिक्रिया मेघना बोर्डिकर यांनी व्हायरल व्हिडीओवर दिली आहे.

bjp mla meghna bordikar video viral on social media

मेघना बोर्डिकर यांची पोस्ट

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;