महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठा भूकंप होणार? नेमका दावा काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठा भूकंप होणार? नेमका दावा काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक घडामोडी घडणार आहेत. या घडामोडींबाबत वेगवेगळे दावे अनेकांकडून केले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5 वर्षांत अनपेक्षित अशा अनेक घडामोडी बघायला मिळाल्या. त्यामुळे आगामी काळातदेखील अनपेक्षित घडामोडी घडताना दिसू शकतात. कारण आगामी काळात राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. पण आता आगामी काळात राज्यातील महायुतीत भूकंप होईल, असा मोठा दावा काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसारत महायुतीत खरंच भूकंप झाला तर राज्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

महायुतीच्या विधानसभा निवडणुकीच्या आगामी जागावाटपावर कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया दिली. “मी यावर आज तर काही बोलू शकत नाही. पण उद्या महायुतीत मोठा भूकंप येईल. तुम्हाला माहिती आहे की, विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा एक उमेदवार पडणार आहे. त्यानंतर आपण बोलू की, कुणाला किती जागा मिळतील. आता कुणाला किती ताकद आहे ते लोकसभा निवडणुकीत दिसली आहे. ज्याची ताकद आहे त्याला देणार”, असा दावा कैलास गोरंट्याल यांनी केला.

“हे वरतून चाललं आहे. त्यांनाही कळलं आहे. तिकीट वाटप भले इथे असेल, पण तिकीट देणारे भाजपचे केंद्रातले मोठे नेते आहेत. भाजप 160 तिकीट शंभर टक्के घेईल. तर इतर दोन पक्षांची जेवढी ताकद आहे तितक्या जागा त्यांना मिळतील. महायुतीच्या जागावाटपामुळे महाराष्ट्रात बंडखोरी जास्त होईल. कारण प्रत्येक मतदारसंघात शिंदे गटाचा माणूस तयार आहे, अजित पवार गटाचा माणूस तयार आहे, तसेच भाजपचे जुने कार्यकर्ते तयार आहेत. बंडखोरी फार मोठ्या प्रमाणात होईल”, असा मोठा दावा कैलास गोरंट्याल यांनी केला.

कैलास गोरंट्याल यांचा विधान परिषद निवडणुबाबातही मोठा दावा

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुतीबाबतही कैलास गोरंट्याल यांनी उघडपणे मोठं वक्तव्य केलं आहे. “विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत आम्हाला माहिती आहे की, आमचे तीन-चार लोकं हे फुटणार आहेत”, असा धक्कादायक दावा कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. “आमचे तीन-चार आमदार फुटणार त्यानुसार आम्ही आमची रणनीती आखलेली आहे. आम्हाला माहिती आहे की, आमच्या उमेदवाराला कोणताही दगाफटका होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे”, अशी देखील माहिती कैलास गोरंट्याल यांनी दिली.

महाविकास आघाडीबद्दल आज ठरवणार आहोत. आमचे जे दोन-तीन लोकं आहेत, कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेला, कुणाचा नवरा राष्ट्रवादीत आहे, एक टोपीवाला कधी इकडे असतो तर कधी तिकडे असतो. तर एक नांदेडवाला आहे. या चारही जणांचं कसं करायचं ते आम्ही ठरवणार आहोत. आम्हाला जे चार दिसत आहेत त्यांचे कान कसे टोचायचे ते आज रात्री ठरणार आहे आणि सर्व रणनीती आखणार आहोत”, अशी प्रतिक्रिया कैलास गोरंट्याल यांनी दिली.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;