IAS पूजा खेडकर वडिलांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख, तरीही क्रिमिलेअर

IAS पूजा खेडकर वडिलांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख, तरीही क्रिमिलेअर

IAS Probationer Pooja Khedkar : पुणे येथील प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी डॉ. पूजा खेडकर अचानक चर्चेत आल्या. बदली झाल्यानंतर त्या चर्चेत आल्या. पूजा खेडकर यांनी प्रबोशनमध्ये असताना विशेष अधिकारांची मागणी केली. त्यात लाल दिव्याची गाडी, व्हीआयपी नंबर प्लेट, खासगी ऑडी कारवर लावलेला महाराष्ट्र सरकारचा बोर्ड, अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी या सर्व प्रकारामुळे पूजा खेडकर प्रसिद्धीस आल्या. IAS पूजा खेडकर कुटुंबियांकडे 110 एकर जमीन, 7 फ्लॅट्स, 1 लाख स्केअर फुटाची 6 दुकाने आहेत. पूजा खेडकर यांच्या नावावर देखील 17 कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या वडिलांनी निवडणूक शपथपत्रात 40 कोटींची संपत्ती दाखवली. त्यानंतर पूजा यांनी नॉन क्रिमिलेअर ओबीसींमधून काढले होते. हा सर्व प्रकार अचंबित करणार आहे.

वार्षिक उत्पन्न ४९ लाख, तरीही क्रिमिलेअर

नॉन क्रिमिलेअर मिळण्यासाठी आई- वडीलांचे कुटुंबाचे उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असावे लागते. परंतु पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी वडिलांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी त्यांची संपत्ती ४० कोटी दाखवली. त्यांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख आहे. नॉन क्रिमीलीयरची मर्यादा ८ लाखांची आहे. मग त्यांचे वडिलांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख असताना त्यांना कसा फायदा मिळाला? हा प्रश्न आहे. दिलीप खेडकर हे प्रदूषण नियंत्रण मंडळात अधिकारी होते.

बेहिशोबी मालमत्तेचा आरोप

लोकसभेच्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यात जमीन 110 एकर, 7 फ्लॅट्स दाखवले आहे. त्यापैकी एक पवई हिरानंदानीमध्ये आहे. 1 लाख 60 हजार स्केअर फूटची 6 दुकाने आहेत. दुसरीकडे 8 लाखांच्या आत उत्पन्न दाखवून नॉन क्रिमिलेअर मिळवले. यातून हे स्पष्ट आहे त्यांच्याकडील ही बेहिशोबी मालमत्ता आहे. या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली.

सरकारी नोकरीतून एवढी संपत्ती मिळवणे कधीच होत नाही. हे जगाला माहीत आहे. पूजा खेडकर यांच्या नावावर देखील 17 कोटींची संपत्ती आहे. एवढं सर्व संपत्ती कमावण्यासाठी दुसरे व्यवसाय लागतात. तसेच पूजा यांची कंपनीसुद्धा आहे. सरकारी नोकरीत असताना कंपनी स्थापन करता येत नाही, असे विजय कुंभार यांनी म्हटले आहे.

पूजा खेडेकर यांच्या गाडीला दंड

पूजा खेडकर प्रकरणात पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. पूजा खेडकर यांच्या गाडीवर पुणे पोलिसांनी 21 हजार रुपयांचा दंड लावला आहे. बेकायदेशीर रित्या गाडीला दिवा बसवल्याने हा दंड लावला आहे. तसेच या प्रकरणाची पुणे पोलीस चौकशी करणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;