Worli Hit & Run Case : ‘रस्त्यावर मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या…’, खासदाराचा संतप्त सवाल

Worli Hit & Run Case : ‘रस्त्यावर मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या…’, खासदाराचा संतप्त सवाल

वरळी हिट अँड रन प्रकरणातील पीडित नाखवा कुटुंबाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 लाख रुपयाची मदत जाहीर केलीय. त्यावर संजय राऊत यांना मीडियाने प्रश्न विचारला. “आरोपीला त्याच्या कुटुंबाला कठोर शिक्षा होत नाही, तो पर्यंत त्या 10 लाखाला किंमत नाही. कावेरी नाखवा यांचा जीव 10 लाखाचा आहे का? असं काही झालं की, मुख्यमंत्री पैसा वाटत फिरतात. त्या खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहेत का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.”या राज्यात कायदा-सुव्यवस्था रस्त्यावर नग्न झालीय. रस्त्यावर चिरडून मरतेय. राज्याचा गृहमंत्री युजलेस आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधी संवेदना नाही. असा गृहमंत्री राज्याला मिळणं दुर्देव आहे. गृहमंत्री आपलं कर्तव्य पार पाडतायत की नाही. मुंबईच्या रस्त्यावर मराठी महिला चिरडून मारली जाते. तिच्या किंकाळ्या, आक्रोश कानापर्यंत पोहोचत नाही. तुमच्या पैशाची मस्ती मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

‘कोणाचा फायदा, कोणाला होणार हे बोलण्याची ही जागा नाही’

उद्या विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. यात 9 महायुतीचे आणि 3 मविआचे उमेदवार रिंगणात आहेत. आज संजय राऊत मीडियाशी बोलताना म्हणाले की, “कोणाचा फायदा, कोणाला होणार हे बोलण्याची ही जागा नाही. शिवसेनेचे ग्रामीण भागातील आमदार आहेत, ते आज पोहोचतील” “शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिलंद नार्वेकर, शेकापचे जयंत पाटील आणि काँग्रेसच्या प्रज्ञात सातव हे तिन्ही मविआचे उमेदवार आहेत. जी रणनिती आम्ही बनवलीय, त्यानुसार तिन्ही उमेदवार विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील. महायुतीने आपले आमदार संभाळावेत” असं संजय राऊत म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;