IMD predicted: मुंबईत पुन्हा मुसळधार, पुढील तीन दिवस हवामान विभागाचा अंदाय काय?

IMD predicted: मुंबईत पुन्हा मुसळधार, पुढील तीन दिवस हवामान विभागाचा अंदाय काय?

मुंबईत सोमवारी मुसळधार पाऊस झाला. एकाच दिवसांत ३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे मुंबईची तुंबई झाली. आता हवामान विभागाने मुंबईसह काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिली आहे. पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या सहा जिल्ह्यांना १२ जुलै ते १४ जुलै दरम्यान ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच ११ जुलै रोजी यलो अलर्ट या भागात दिला आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्यात चार दिवस यलो अलर्ट दिला आहे. यामुळे मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गुरुवारी पालघरमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली. पालघर, बोईसर परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.

महाराष्ट्रात सर्वत्र मान्सून सक्रीय

महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रीय झाला आहे. यामुळे धरणांमधील पाण्याची पातळी वाढत आहे.शहापूरमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. भातसा धरण क्षेत्रात अद्यापपर्यत 968.00 मि.मी असा चांगला पाऊस झाला. यामुळे धरणाची पाणी पातळी 115.06 मीटर इतकी वाढली आहे. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील वरखेड, एनगाव, निमखेड या परिसरात जोरदार ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नदी नाले दुथडी भरून वाहू लागले होते.

चांदोली धरण 50 टक्के भरले

सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे चांदोली धरण आता 50 टक्के भरले आहे. दोन दिवसांपासून या ठिकाणी पावसाने उघडीप दिली असली तरी समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे.34.40 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या धरणामध्ये 17.36 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.गतवर्षीच्या तुलनेत नऊ दिवस आधीच वारणा धरण 50 टक्के भरले.

विदर्भात पावसाचे सरी

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी सुरु आहे. गोंदिया जिल्ह्यात एक दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी बरसल्याने शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;