4 पक्ष, 4 हॉटेल, शेकडो आमदार आणि विधान परिषद निवडणूक, मुंबईच्या पोटात राजकारण शिजतंय

4 पक्ष, 4 हॉटेल, शेकडो आमदार आणि विधान परिषद निवडणूक, मुंबईच्या पोटात राजकारण शिजतंय

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता तापताना दिसत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. महाराष्ट्रातील 4 पक्षांच्या आमदारांची आता आजपासून हॉटेलवारी सुरु झाली आहे. चारही पक्ष आजच आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत. भाजपच्या आमदारांची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजप आपल्या आमदारांना ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ठेवणार आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत. शिंदे गटाचे आमदार वांद्र्यातील ताज लँड हॉटेलमध्ये असतील. अजित पवार गटाचे आमदार द ललीत हॉटेलमध्ये असतील. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार ITC ग्रँड हयात हॉटेलमध्ये राहणार आहेत.

भाजपकडून पक्षाच्या सर्व आमदारांची आज रात्री हॉटेल ताज प्रेसिडेंडमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजप आमदारांना आजच्या बैठकीत मतांचा कोटा ठरवून दिला जाणार आहे. आमदारांसाठी आज रात्री पार पडणाऱ्या बैठकीत याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. कुठल्या आमदाराने कुठल्या उमेदवाराला मते द्यायची याचे मार्गदर्शन आज होणार आहे. विशेष म्हणजे विधानपरिषद निवडणुकीची रंगीत तालीम उद्या होणार आहे. हॉटेल ताज प्रेसिडेंडमध्येच मतदानाची रंगीत तालीम उद्या पार पडणार आहे.

शिंदे गटात काय घडतंय?

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांची ताज लँड हॉटेलमध्ये बैठक बोलावली आहे. ही बैठक आज रात्री 9 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: उपस्थित राहणार आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आजची बैठक महत्त्वाची आहे.

ठाकरे गटात काय घडतंय?

ठाकरे गटाकडून आज विधानपरिषद निवडणुकीच्या पक्षाच्या सर्व आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. परेल येथील ITC ग्रँड हॉटेल येथे हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे देखील स्नेहभोजनासाठी उपस्थित राहणार आहेत. मुंबई पदवीधर आमदार अनिल परब निवडून आल्याने हे स्नेहभोजन अनिल परब यांनी आयोजित केल्याची माहिती आहे. याशिवाय 12 तारखेला विधान परिषदेची निवडणूक असल्याने आमदारांना हॉटेलमध्येच ठेवणार असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाचे आमदार ITC गँड हॉटेलमध्ये आजपासून 12 जुलैपर्यंत राहणार आहेत.

अजित पवार गटात हालचाली काय?

अजित पवार गटात आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. अजित पवार यांनी आज विधान भवनात त्यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांना तातडीने बोलावून घेतले. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने यावेळी महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक मतांचा राष्ट्रवादीचा कोटा निश्चित करण्याबाबतची बैठक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजित पवार गटाच्या आमदारांना आता द ललीत हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;