वरळी हिट अँड रन केस प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट, आरोपी मिहीर शाहची महत्त्वाची पोलिसांसमोर कबुली, म्हणाला…

वरळी हिट अँड रन केस प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट, आरोपी मिहीर शाहची महत्त्वाची पोलिसांसमोर कबुली, म्हणाला…

वरळी हिट अँड रन केल प्रकरणातील आरोपी मिहीर शाग याला पोलिसांनी अटक केली. आज बुधवारी शिवडी कोर्टामध्ये मिहीर शाहला हजर केलं गेलं होतं. कोर्टाने आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. येत्या 16 जूनपर्यंत मिहीर शाह पोलीस कोठडीत असणार आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात विरार येथून ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणात आरोपी मिहीर शाहने पोलिसांसमोर कबुली दिल्याने मोठा ट्विस्ट आला आहे.

वरळी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी  मिहीर शाह आपल्या परिवारासह फरार झालेला. पोलिसांनी त्याचे वडील राजेश शाह आणि त्यांच्या ड्रायव्हरला अटक केली होती. राजेश शाहने  पोलिसांना सांगितलेलं की अपघातावेळी त्यांचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. पोलिसांनी कोर्टात दोघांना हजर केल्यावर त्यातील ड्रायव्हरला एक दिवसाची पोलीस कोठडी दिली गेली होती. तर राजेश शाहला न्यायालयीन कोठडी मिळाली होती.

शहापूरमधील एका रिसॉर्टमध्ये ते लपून बसले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सहा पथके रवाना केली होतीत. आपल्या तांत्रिक यंत्रणांच्या मदतीने मिहीर शाहचा पत्ता काढला. त्याच्या कुटूंबाला शहापूर तर मिहीर याला विरार फाटा येथून पोलिसांंनी ताब्यात घेतलं. मेडिकल तपासणी झाल्यावर त्याची पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीमध्ये त्याने पोलिसांन अपघातावेळी आपण गाडी चालवत असल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याचे वडील राजेश शाह यांनी पोलिसांना खोटं सांगत ड्रायव्हरला या प्रकरणात अडकवत मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला हे सिद्ध झालं.

दरम्यान, दरम्यान, जुहूमधील तसप बारवर मुंबई महापालिकेने बुलजडोझर कारवाई केली आहे. परवानगी नसलेल्या भागात मद्यपान विक्री केल्याने अवैध बांधकामावर तोडक कारवाई झाली. त्यासोबतच मिहीर शाह याचं वय 25 पूर्ण नसताना त्याला रम, वोडका आणि व्हिस्कीसारखे मद्य दिलं. नियमानुसार 25 वर्षे वय असलेल्यांना मद्य देता येऊ शकतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;