‘त्या’ घरावर मुख्यमंत्री बुलडोझर चालवणार का?; वरळी हिट अँड रन प्रकरणावरून आदित्य ठाकरे आक्रमक

‘त्या’ घरावर मुख्यमंत्री बुलडोझर चालवणार का?; वरळी हिट अँड रन प्रकरणावरून आदित्य ठाकरे आक्रमक

वरळी हिट अँड रन प्रकरणावरून वातावरण तापलं आहे. विरोधकांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मृत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर आक्रमक होत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही सवाल केले आहेत. वरळीची केस हिट अँड रनची नाही. तर मर्डर केस म्हणून बघावी. मी त्या कुटुंबीयांची भेट घेतली. तो अपघात इतका भयंकर होता की एखादा राक्षसच असं काही करू शकतो. 60 तास मिहीर राजेश शाहला लपवला. त्याच्या घरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलडोझर मुख्यमंत्री चालवणार आहेत का?, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

आदित्य ठाकरेंचा सवाल

अपघात झाल्यानंतरही त्या महिलेला 2 किलोमीटरपर्यंत गाडी फरफटत त्याने नेलं. हे किती दुर्देवी आहे. राजेश शाहाला पदावरून काढलं आहे, पक्षातून काढला नाही. पक्ष कुठला असो तुम्ही त्याच्या घरावर बुल्डोजर चालवणार का?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

हिट अँड रन प्रकरणात नेमकं काय घडलंय?

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला काल अटक करण्यात आली. त्याला आज पोलिसांनी कोर्टात हजर केलं. हा अपघात झाला. तेव्हा आपण स्वत: गाडी चालवत असल्याचं मिहिरने मान्य केलं. जुहूतील तपस बारवर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. बुलडोझरच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे. बारमधील अवैध बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंचं भाष्य

मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. यावर आदित्य ठाकरेंनी भाष्य केलंय. आरक्षणबाबत त्यांच्याकडे उत्तर नाही. विरोध आमचा कशाला नाही. तिसऱ्यांदा ही बैठक बोलवली. तुम्ही लोकांसमोर जे काय ते मांडा. सभागृहात मांडा. हा फास आहे. समाज कुठेही फसणार नाही. आम्ही लेखी उत्तर त्याला देणार नाही. ही दादागिरी त्यांची चालणार नाही. उद्धव ठाकरे हे बोलले आहेत सर्वानुमते निर्णय घ्या, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. कोस्टल रोडला 7 महिने आधीच उशीर झाला आहे. डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण होणार होता. निवडणुकीसाठी हा रस्ता टप्याटप्याने खुला करत आहेत, असंही ते म्हणालेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;