“मिहीर शाहाने दोनदा केल्या मेडिकल टेस्ट आणि त्यानंतर…”, विरोधी पक्षनेत्यांनी केली SIT चौकशीची मागणी

“मिहीर शाहाने दोनदा केल्या मेडिकल टेस्ट आणि त्यानंतर…”, विरोधी पक्षनेत्यांनी केली SIT चौकशीची मागणी

Worli Hit and run case : मुंबईतील वरळी परिसरात महिलेला क्रूरपणे गाडीखाली चिरडल्याप्रकरणी अखेर मिहीर शाहाला अटक करणअयात आली. तब्बल तीन दिवसांनी वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाचा नेता राजेश शाहाचा मुलगा मिहिर शाहाला बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्यासह त्याला पळून जाण्यात मदत करणारे कुटुंबिय आणि मित्रालाही ताब्यात घेण्यात आले. आता याप्रकरणी SIT चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वरळी हिट अँड रनप्रकरणी आरोपीला वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी SIT चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

“वरळी हिट अँड रन प्रकरण सरकार कडून जाणूनबुजून दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी आरोपीला वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे वरळी हिट अँड रन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी. कारण त्या आरोपीने २४ तासांनी किंवा ४८ तासांनी दारु प्यायली होती की नाही, याची माहिती समोर येणार नाही. त्यामुळे त्याला लपवण्यात आले. तो कुठे आहे हे पोलिसांना माहिती होते. पण मुद्दाम त्याला लपवण्यात आले. त्याने दोन वेळा मेडीकल टेस्ट केल्या. त्यानंतर जेव्हा त्याला वाटलं की आता माझ्या शरीरात अल्कोहोल नाही तेव्हा तो पोलिसांच्या शरण आला”, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

“पोलिसांनी त्याला अटक केल्याचा बनाव रचला, हे स्पष्ट आहे. एका निरपराध महिलेचा जीव गेला, तिला कोणीही मदत केली नाही. जेव्हा पुण्यात अशाप्रकारची घटना घडली होती, तेव्हा तातडीने मदत करण्यात आली होती. तेही केले नाही. यातून आरोपीला पूर्णपणे सेफ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा सरकार आणि पोलिसांचा कट आहे”, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

“त्याने हा खूनच केला आहे. दीड वाजेपर्यंत तो दारु प्यायला. तसेच ज्या ठिकाणी तो दारु प्यायला तो बार 2 वाजेपर्यंत सुरु असतो. पब, डान्सबार हे सर्व ५ वाजेपर्यंत सुरु असते. त्यामुळे यावर काहीतरी निर्बंध असायला हवेत. यावर काहीतरी कायदेशीर कारवाई असायला हवी. तो सतत ड्रायव्हरला फोन करत होता. पुण्याप्रमाणेच हा सर्व प्रकार ड्रायव्हरने केला असे दाखवण्याचाही प्रयत्न करण्यात आला”, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;