आता इंग्रजी नावे हद्दपार, मरीन लाईन्स आता मुंबादेवी होणार , तर करीरोडला काय म्हणाल ? ; 7 रेल्वे स्थानकांच्या नामकरणाचा प्रस्ताव मंजूर

 आता इंग्रजी नावे हद्दपार, मरीन लाईन्स आता मुंबादेवी होणार , तर करीरोडला काय म्हणाल ? ; 7 रेल्वे स्थानकांच्या नामकरणाचा प्रस्ताव मंजूर

ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या नावे मुंबई उपनगरातील अनेक स्थानकांना मिळाली होती. इतकी वर्षे ही नावे या रेल्वे स्थानकांची ओळख बनली होती. आता या स्थानकांच्या नावांना स्थानिक परिसरातील ओळखीनूसार नावे देण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावा राज्य विधान सभेच्या पावसाळी अधिवेशनात अखेर मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे या स्थानकांची जुनी ओळख पुसली जाणार आहे. आता यापुढे इंग्रजी नावे जाऊन नवीन मराठी नावे स्थानकांना मिळणार आहेत. त्यामुळे आता मरीन लाईन्स मुंबादेवी असे त्या परिसराला साजेसे असे  नाव मिळणार आहे. तर करीरोडला काय नाव मिळणार आहे. ? ते पाहूयात….

मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव आज विधानसभेत अखेर मंजूर करण्यात आला आहे. आता हा ठराव केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे. त्यानंतर रितसर नावं बदलण्यात येणार आहेत. आता करी रोड – लालबाग रेल्वे स्थानक म्हटले जाणार आहे. तर पुढील बदल अनुक्रमे सँडहर्स्ट रोड – डोंगरी रेल्वे स्थानक, मरीन लाईन्स – मुंबादेवी, चर्नी रोड – गिरगाव, कॉटन ग्रीन – काळाचौकी, डॉकयार्ड रोड – माझगाव रेल्वे स्थानक, किंग सर्कल – तीर्थकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक अशी नावे देण्यात आली आहेत.

मुंबई सेंट्रलला नाना शंकर शेठ याचं  नाव कधी ?

मुंबई सेंट्रस स्थानकाला मुंबईचे शिल्पकार समाजसेवक नाना शंकर शेठ असे नाव देण्यात यावे अशी मागणी नामदार जगन्नाथ ( शंकर ) शेठ प्रतिष्ठान  गेली कित्येक वर्षे करीत आहे. परंतू या स्थानकाचे नाव बदलण्यात आले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नाना शंकर शेठ यांना आशियातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 साली मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर धावली होती.  या जीआपीआर रेल्वे कंपनीचे कार्यालयच नाना शंकर शेठ यांच्या घरात उघडण्यात आले होते. व्हीक्टोरीया टर्मिनस या स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नाव देण्याची मागणी 90 च्या दशकात कॉंग्रेसने केली होती.

अरविंद सावंत यांनी केली होती मागणी

मध्य रेल्वेच्या स्थानकांची इंग्रजी नावे बदलण्याची मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सर्वप्रथम केली होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार जाऊन महायुतीचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर गेल्या वर्षी तत्कालीन खासदार राहुल शेवाळे यांनी पुन्हा ही मागणी लावून धरली. त्यानंतर राज्यविधीमंडळात हा प्रस्ताव अखेर मंजूर झाला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;