त्याला आमच्या ताब्यात द्या..; वरळी हिट अँड रनप्रकरणी जयवंत वाडकर यांची संतप्त प्रतिक्रिया
वरळी हिट अँड रन प्रकरणावर अभिनेते जयवंत वाडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयवंत वाडकर हे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी या महिलेचे काका आहे. या अपघात प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वाडकर यांचे डोळे पाणवले. तसंच या प्रकरणातील आरोपीला आमच्या ताब्यात दिलं पाहिजे, असं संतप्त प्रतिक्रिया जयवंत वाडकर यांनी दिली आहे. या प्रकरणातील आरोपीच्या वडिलांना जामीन मिळालाय. पण आरोपी मुलाचे सगळे रेकॉर्ड तुमच्याकडे आहेत. तो मुलगा कुठे गेला. त्याने कुठे गाडी सोडली याचे रेकॉर्ड्स तुमच्याकडे आहेत. तो कुठे गेला. त्याने कुठे गाडी सोडली. तो कुठल्या बारमध्ये होता. तो मग घरी आला त्याने मर्सिडिज गाडी कुठे ठेवली. मग दुसरी गाडी घेतली. हा सगळा रेकॉर्ड तुमच्याकडे आहे. पण तरी तो मुलगा गायब होतो. याचंच मला आश्चर्य वाटतं, असं जयवंत वाडकर म्हणालेत.
जयवंत वाडकर यांची संतप्त प्रतिक्रिया
अशा लोकांना आमच्या ताब्यात दिलं पाहिजे. लोकांच्या हातात दिलं पाहिजे. आपण म्हणतो की कायदा हातात घ्यायचा नाही. माझा भाऊजी सांगतोय की गाडी थांबव- गाडी थांबव… पण त्याने ऐकलं नाही. तो दोन ते तीन किलोमीटर तीला फरफटत नेलं. शेवटी तिला घेण्यासाठी माझ्या भाऊजीला टॅक्सी करून जावं लागलं, असं जयवंत वाडकर यांनी म्हटलं आहे.
मी दवाखान्यात गेलो नव्हतो. पण नातेवाईक तिथं होते. तिला बघायला बोलवलं तेव्हा सगळे हादरले. तिची तशी अवस्था बघवत नव्हती माझ्या भावाला कर चक्कर आली. इतकं विकृत कुणी कसं असू शकतं. उंदीर आडवा आला तरी आपण गाडी थांबवतो. मग एका महिलेला पाहून तुम्ही थांबत नाही म्हणजे काय? बोनेटवर असणारी व्यक्ती पाहून तुम्ही थांबत नाही, हे किती निर्दयीपणाचं लक्षण आहे, असं जयवंत वाडकर म्हणाले. हे सगळं सांगताना जयवंत वाडकर गहिवरले. त्यांना अश्रू अनावर झाले.
आरोपी अटकेत
दरम्यान, वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी मिहिर शाह याला अटक केली आहे. या अपघातानंतर फरार झाला होता. पण आज पोलिसांनी मिहिर शाह याला अटक केली आहे. पोलिसांनी मिहिरसह 12 जणांना अटक केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List