मंत्रालयात खळबळजनक घटना, वृद्धाचा टोकाचा निर्णय, सुदैवाने…, पाचव्या मजल्यावर काय घडलं?

मंत्रालयात खळबळजनक घटना, वृद्धाचा टोकाचा निर्णय, सुदैवाने…, पाचव्या मजल्यावर काय घडलं?

मंत्रालयात एका व्यक्तीने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. काम होत नसल्याने संतापलेल्या या व्यक्तीने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून या व्यक्तीचे सुरुवातीला मनधरणीचे प्रयत्न केले गेले. पण संबंधित व्यक्ती ऐकून घेण्याच्या मनस्थीत नव्हती. आपलं काम होत नसल्याने या व्यक्तीने मंत्रालयाच्या थेट पाच मजल्यावरुन खिडकीतून बाहेर पडत स्वत:ला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. अग्निशामक दल आणि पोलिसांकडून या व्यक्तीला वाचवण्याचे प्रचंड प्रयत्न झाले.

परिमंडल 1 चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी संबंधित ज्येष्ठ नागरिकाला समजवण्याचा प्रयत्न केला. या ज्येष्ठ नागरिकाला उतरवण्याचा प्रयत्न केला गेला. पण तरीही संबंधित ज्येष्ठ व्यक्ती संतापलेला होता. त्याने पोलिसांच्या विनंतीचा विचार केला नाही. ही व्यक्ती पोलिसांसमोर आपली भूमिका मांडत राहिली. घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या साहाय्याने या व्यक्तीजवळ जात त्याचे प्राण वाचवण्याचं काम केलं.

वृद्धाला सुखरुप आतमध्ये नेलं

यावेळी पोलिसांनी वृद्धाला विनंती करत आपल्यासोबत बातचित करण्यासाठी व्यस्त केलं. तेवढ्यात अग्मिशामक दलाच्या जवानांची क्रेन पाचव्या मजल्यावर पोहोचली. यावेळी अग्मिशामक दलाच्या जवानांनी वृद्धाला विनंती करत आतल्या बाजूला नेलं. दरम्यान, संबंधित व्यक्ती खाली पडला तरी जाळीवर पडावा, याचेदेखील प्रयत्न करण्यात आले. जवळपास अर्धा ते एक तास याबाबतच्या घडामोडी घडल्या.

पोलीस आता या वृद्धाचं नेमकं म्हणणं काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतील. तसेच संबंधित विभागास वृद्धाचे प्रश्न सोडवण्यासाठी आवाहन केलं जाईल. पण वृद्धाच्या टोकाचा निर्णयामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने कोणताही गैरप्रकार घडला नाही. प्रत्येक जीव हा महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे आपल्या कुटुंबासाठी आपला जीव जास्त आवश्यक आहे. त्यामुळे परिस्थितीला सामोरं जात लढा द्यायला हवा. अशाप्रकारे टोकाचा निर्णय कुणीही घेऊ नये, असं आवाहन वारंवार केलं जातं. याआधीदेखील अनेकदा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न झाला आहे. याच घटनांची दखल घेऊन मंत्रालयात जाळी बसवण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;