मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा, यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे आयुक्तांचे निर्देश

मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा, यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे आयुक्तांचे निर्देश

मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा  देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांंनी दिले आहेत. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

भारतीय हवामान खात्याने, मुंबई महानगराला अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे.

अति मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता, नागरिकांना सतर्क रहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक १९१६ यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय हवामान खात्याने मुंबईत अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबईकर नागरिकांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने महानगरपालिकेची यंत्रणा असल्याचे म्हटले आहे.

आज मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली होती. अनेक ठिकाणी रुळावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले, रात्रीपर्यंत वाहतूक ही पूर्ववत झाली असली तर ती धिम्या गतीने सुरु होती. मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु होती. मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;