खंडणी प्रकरणात ट्विस्ट, अरुण गवळी संदर्भातील कागदपत्रे गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती उघड

खंडणी प्रकरणात ट्विस्ट, अरुण गवळी संदर्भातील कागदपत्रे गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती उघड

खंडणी प्रकरणातील आरोपी अरुण गवळी संदर्भातील काही कागदपत्रे गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अरुण गवळी याच्यावर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम अ‍ॅक्ट (मोक्का) लागू करण्यासंदर्भात कागदपत्रे गहाळ झाल्याची माहिती शुक्रवारी क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी मुंबई सत्र न्यायालयात मोक्का कोर्टात दिली. शिवसेना नेते आणि नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अरुण गवळी सध्या जामिनावर बाहेर आहे. कथित खंडणी, आर्थिक लाभ आणि 2005 मध्ये मुंबई, ठाणे आणि कल्याणधील मालमत्ता हडप करण्यासाठी काहींना धमक्या दिल्याचा आरोप अरुण गवळी आणि त्याच्या टोळीतील काही जणांवर आहे.

खंडणी प्रकरणात उलट तपासणीसाठी गवळीच्या वकिलांना कागपदत्रांची मागणी केली होती. पण, विशेष सरकारी वकिलांनी 2013 मध्ये मुंबईत पूर आला असताना ठेवलेली कागदपत्रे सापडत नसल्याचं न्यायालयात म्हटलं. न्यायालयानं गेल्याच महिन्यात पोलिसांना कागदपत्रांवरून खडसावलं होतं. अस्पष्ट विधान मान्य केली जाणार नाहीत, असं म्हटलं होतं. दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खटल्यास आणखी विलंब करू शकत नाही. त्यामुळे कागदपत्रे सादर करण्यास किती वेळ लागेल? ते सांगा, अशा शब्दांत न्यायालयाने पोलिसांना सुनावलं होतं.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील एका बिल्डरला 2005 मध्ये गवळीच्या टोळीकडून धमकीचे फोन आले होते. त्यात राम श्याम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत पुनर्विकास प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी 50 लाख रूपयांची मागणी केली होती. त्यासह बिल्डरला ठार मारण्याच्या धमक्या देऊन गवळीचे घर असलेल्या दगडी चाळीत जाण्यास सांगितलं होतं. नंतर गवळी आणि त्याच्या साथीदारांवर खंडणी, धमकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर गवळी आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;