Mumbai Rains Update : मुंबईतील स्थितीबद्दल मुख्यमंत्री शिंदेंकडून महत्वाची अपडेट, लोकल ट्रेन बद्दल काय बोलले?

Mumbai Rains Update : मुंबईतील स्थितीबद्दल मुख्यमंत्री शिंदेंकडून महत्वाची अपडेट, लोकल ट्रेन बद्दल काय बोलले?

मुंबईला रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका बसलाय. मुंबईची लाइफ लाईन मध्य रेल्वे कोलमडली आहे. सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. या स्थिती संदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी TV9 मराठीशी संवाद साधला. “मी आताच रेल्वेच्या डीआरएमशी बोललो, चर्चा केलीय. महापालिका आयुक्त, डिझास्टर मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चुनाभट्टी, मानखुर्द या ठिकाणी पाणी साचलय. हार्बर, फास्ट लाइन आता सुरु होतेय. पंपाने पाणी काढायच काम सुरु आहे. सांताक्रूझ येथे 267 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 65 मीमी पाऊस पडला की, आपण अतिवृष्टी समजतो. रात्रभर खूप जास्त पाऊस पडला” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. पंपाने पाणी काढायच काम सुरु करा. लवकरच पाणी कमी होईल. वाहतूक सुरळीत होईल. प्रवाशांची गैरसोय दूर होईल. अशा प्रकारे यंत्रणा काम करतेय” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आमदारांना फटका बसलाय. अमोल मिटकरी, अनिल पाटील संजय गायकवाड यांना पावसाचा फटका बसला, त्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, “रेल्वेने आमदार, मंत्री आलेत. त्यांना या वाहतूक कोंडीचा फटका बसलाय. यंत्रणा फास्ट काम करतायत. पाऊस जास्त पडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अशी स्थिती झाली. प्रवाशांना विनंती आहे की, थोडं सहकार्य करा, लवकरच गैरसोय दूर होईल”


रेल्वे कधी सुरु होणार? त्या बद्दल काय बोलले?

“सिंधुदुर्ग, रायगडमध्ये रेड अलर्ट आहे. सीएसटी-कल्याण ही स्लो लाइन सुरु आहे. फास्ट लाइन सुरु होईल. सायन-कुर्ला इथे पाणी भरलय. लवकरच सर्व यंत्रणा काम करतायत. यातून मार्ग निघेल” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “NDRF ला सूचना दिलेल्या आहेत. पाणी भरतं त्या ठिकाणी एनडीआरएफच्या तुकड्या पोहोचल्या आहेत. मुंबईकरांकडून थोडं पाणी कमी होईपर्यंत सहकार्याची आवश्यतकता आहे. पाऊस जास्त पडला. लवकरच यामध्ये मार्ग निघेल. युद्धापातळीवर टीम काम करतेय” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;