Mumba Heavy Rain : मुंबईत पावसामुळे कुठे पाणी साचलय? रेल्वे स्थानकात काय स्थिती? खास PHOTOS
मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. मुंबईची लाइफ लाईन समजली जाणारी मध्य रेल्वे कोलमडली आहे. अनेक रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याच चित्र आहे.
मुंबईत रविवारी रात्री 1 ते सोमवारी सकाळपर्यंत 7 वाजेपर्यंत 300 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. माटुंग्याच्या किंग सर्कल परिसरातील ही दृश्य आहेत.
मुंबईत सीजनमधील पहिल्याच पावसाने प्रशासनाची पोलखोल केली आहे. दरवर्षीप्रमाणे मुंबईत नालेसफाईचे दावे केले जात होते. पण मुंबापुरीची तुंबापुरी झाली आहे. कुर्ला बंटारा भवन भागातील ही दृश्य आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List