मुंबईतील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील शिंदे गटातील बड्या नेत्याच्या मुलाची बारमध्ये पार्टी… त्यानंतर काय घडले?

मुंबईतील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील शिंदे गटातील बड्या नेत्याच्या मुलाची बारमध्ये पार्टी… त्यानंतर काय घडले?

पुणे येथील बड्या बिल्डरच्या मुलाचे ‘हिट अँड रन’चे प्रकरण समोर आले होते. त्या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील आणि पुण्यातील कोट्यधीश व्यक्ती विशाल अग्रवाल याला अटक झाली होती. त्यानंतर अल्पवयीन मुलाची आई आणि अजोबा यांनाही अटक झाली. आता त्यानंतर मुंबईतील वरळीमधील ‘हिट अँड रन’चे प्रकरण रविवारी पहाटे घडले. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बडे नेते राजेश शाह यांच्या मुलाचे नाव समोर आले आहे. राजेश शाह आणि त्याचा चालक याने वरळीत एका दुचाकीला उडवले. त्यात कावेर नखवा (वय ४५) या महिलेचा मृत्यू झाला. आता या प्रकरणातील राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह अडचणीत येत आहे. मिहिर याने शनिवारी रात्री जुहूच्या व्हॉईस ग्लोबल बारमध्ये पार्टी केली. यामुळे मुंबई पोलीस आता बारमध्ये पोहचले आहे.

पोलिसांचे पथक बारमध्ये

वरळी ‘हिट अँड रन’चे प्रकरणात आग्रीपाडा पोलीस आणि जुहू पोलिसांचे पथक जुहू येथील व्हाइस बारमध्ये पोहोचले. या प्रकरणातील आरोपी मिहिर शाह याने काल रात्री ११ वाजता जुहूच्या व्हॉईस ग्लोबल तापस बारमध्ये आपल्या मित्रांसोबत पार्टी केली होती. पार्टीनंतर तो वरळीच्या दिशेने निघाला. त्यानंतरच अपघाताची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्रीपाडा आणि जुहू पोलिसांचे पथक वाइस ग्लोबल बारमध्ये पोहोचले. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

मुंबई पोलिसांच्या तीन गाड्या याठिकाणी पोहोचल्या आहेत. सुमारे अर्धा तासापेक्षा जास्त वेळ पोलिसांचे पथक घटनास्थळी आहे. पार्टीत किती लोक सहभागी झाले होते आणि त्यांनी मद्यपान केले होते का, याचीही माहिती घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. पोलीस बारमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत.

दरम्यान, शिवसेना उबाठा नेते आमदार सचिन अहिर यांनी या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे. हिट आणि रन अपघाताच्या घटना वारंवार होत आहेत. यापूर्वी पुण्यामध्ये अशी घटना घडली होती. या प्रकरणात आपण पोलिसांच्या संपर्कात आहोत, असे आमदार अहिर यांनी म्हटले आहे.

कायद्यासमोर सर्व समान- एकनाथ शिंदे

मुंबईतील ‘हिट अँड रन’ प्रकरणात शिंदे गटातील नेता आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कायद्यासमोर सर्व समान आहे. सरकार देखील सगळ्या घटनांकडे समान दृष्टीने पाहते. त्यामुळे या घटनेला वेगळा न्याय दिला जाणार नाही. जे होईल ते कायदेशीर रित्या होणार आहे. कोणालाही पाठीशी घातली जाणार नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;