मुंबई हिट अँड रनप्रकरणात मोठी अपडेट; महिलेच्या मृत्यूला कारणीभूत कार शिंदे गटातील या बड्या नेत्याची

मुंबई हिट अँड रनप्रकरणात मोठी अपडेट; महिलेच्या मृत्यूला कारणीभूत कार शिंदे गटातील या बड्या नेत्याची

वरळीतील भल्या पहाटे घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. दुचाकीवरील दाम्पत्याला ठोकरल्यानंतर महिलेला फरफटत नेण्याची घटना वरळीत घडली होती. भल्या पहाटे झालेल्या या अपघातात महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. आता या प्रकरणात पोलिसांनी शिंदे गटातील उपनेत्याला ताब्यात घेतले आहे. त्याची कार पण सापडली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार ही कार उपनेत्याचा मुलगा चालवत होता.

उपनेते राजेश शाह ताब्यात

भल्या पहाटे 5:30 वाजता हा अपघात घडला. प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटातील उपनेते राजेश शहा यांना ताब्यात घेतले आहे. राजेश शाह यांचा मुलगा आणि ड्रायव्हर चारचाकीत असल्याचे समोर येत आहे. दुचाकीला कारची मागून धडक बसली. त्यानंतर कारचालक घटनास्थळावरुन कारसह फरार झाले होते. मुलगा आणि कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणात पुढील तपास करत आहे.

मिहीर शाह कार चालवत होता

मुलगा आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह हा कार चालवत असल्याचे समोर आले आहे.  आता हे प्रकरण ड्रंक अँड ड्राईव्हचे तर नाही ना, यादृष्टीने पण पोलिसांनी तपास करत आहेत. प्लेटवरुन ही कार राजेश शहा यांच्या नावावर असल्याचे समोर आले. ते कारमध्ये नव्हते अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. याविषयी पुढील तपासात बाबी समोर येतील.

भल्या पहाटे घडला अपघात

वरळीत भल्या पहाटे हिट अँड रनची घटना घडल्याचे समोर आले होते. मच्छी आणण्याठी गेलेल्या कोळी दांपत्याला पहाटे ५:३० वा चार चाकीने फरफटत नेले . वरळीतील अॅट्रीया मॉलजवळ ही घटना घडल्याचे समोर आले होते. वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा दांपत्य हे सकाळी ससून डॉकला मच्छी आणण्यासाठी गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना एका चारचाकीने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली.

महिलेला नेले फरफटत

दुचाकीवर मोठ्याप्रमाणात मच्छी वाहून नेत असल्याने त्यांच्या दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि दोघंही चार चाकीच्या बोनटवर पडले. त्यावेळी वेळीच नवऱ्याने कारच्या बोनटवरून बाजूला उडी टाकली. मात्र महिलेला स्वत:ला बाजूला होता आलं नाही. अशातच अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने कार काही थांबवली नाही आणि त्याने कार दामटली. त्यात कोळी महिलेला फरफटत गेली. तिला उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;