‘हिट अँड रन’ च्या घटनेने मुंबई हादरली; भरधाव कार चालकाने महिलेले नेले फरफटत, वरळीत भल्या पहाटे काळाचा घाला

‘हिट अँड रन’ च्या घटनेने मुंबई हादरली; भरधाव कार चालकाने महिलेले नेले फरफटत, वरळीत भल्या पहाटे काळाचा घाला

पुण्यातील कल्याणीनगरमधील हिट अँड रन केसने संपूर्ण देशाला हादरा दिला. त्यानंतर असे प्रकार कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे दिसून आले. राज्यातच गेल्या महिन्यात असे अनेक प्रकार समोर आले आहे. त्यात काहींना नाहक जीव गमवावा लागला आहे. आता वरळीतून हिट अँड रन च्या घटनेने मुंबई हादरली आहे. यात एका महिलेला तिचे प्राण गमवावे लागेल आहे. तर कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला आहे.

वरळीत ‘हिट अँड रन’ची घटना

वरळीत भल्या पहाटे हिट अँड रनची घटना घडल्याचे समोर आले आहे. मच्छी आणण्याठी गेलेल्या कोळी दांपत्याला पहाटे ५:३० वा चार चाकीने फरफटत नेले. वरळीतील ॲट्रीया मॉलजवळ ही घटना घडल्याचे समोर आले आहे. वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा दांपत्य हे सकाळी ससून डॉकला मच्छी आणण्यासाठी गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना एका चारचाकीने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली.

महिलेला नेले फरफटत

दुचाकीवर मोठ्याप्रमाणात मच्छी वाहून नेत असल्याने त्यांच्या दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि दोघंही चार चाकीच्या बोनटवर पडले. त्यावेळी वेळीच नवऱ्याने कारच्या बोनटवरून बाजूला उडी टाकली. मात्र महिलेला स्वत:ला बाजूला होता आलं नाही. अशातच अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने कार काही थांबवली नाही आणि त्याने कार दामटली. त्यात कोळी महिलेला फरफटत गेली.

अपघातात महिलेचा मृत्यू

कार चालकाने वेळीच कार थांबवली असती तर कदाचित महिलेचा जीव वाचला असता. त्याने कार दामटल्याने ही महिला फरफटत गेली. त्यामुळे ती जखमी झाली. कोळी महिलेला उपचारासाठी नायर रुग्णालयात नेले असता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अपघातानंतर भेदरलेल्या कार चालकाने घटनास्थळाहून पोबारा केला. वरळी पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहे. राज्यात हिट अँड रनचे प्रकार वाढले आहे. पुण्यानंतर जळगाव, बुलढाणा आणि राज्यातील इतर शहरात असे प्रकार घडले आहे.  या घटनांमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;