Ajit Pawar : येथे कमी पडल्याने पण लोकसभेत महायुतीला अपयश, रोखठोक मते मांडणाऱ्या अजितदादांची जाहीर कबुली

Ajit Pawar : येथे कमी पडल्याने पण लोकसभेत महायुतीला अपयश, रोखठोक मते मांडणाऱ्या अजितदादांची जाहीर कबुली

महायुतीने विधानसभेसाठी मशागत करायला सुरुवात केली आहे. पावसाळी अधिवेशनातील बजेटमधून त्याची झलक सर्वांना दिसली. आता तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी महायुतीने रणशिंग फुंकले आहे. त्यात विधानसभेसाठी हुंकार भरण्यात आला आहे. पण त्याअगोदर लोकसभेतील हाराकिरीचे विश्लेषण, मंथन पण करण्यात आले. पराभवाला नेमकं कारणं कोणती याचा माग काढण्यात आला. अजित पवार यांनी पुढे जाताना लोकसभेसाठी कशात कमी पडलो, याची उजळणी केली.

महायुतीचे पदाधिकारी हजर

मुंबईतील सायन येथील षण्मुखानंद सभागृहात महायुतीचा मेळावा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप या तीनही पक्षाचे पदाधिकारी एकत्रित या मेळाव्याला हजर होते. त्यावेळी अजितदादांनी तडाखेबंद भाषण केले.

लोकहिताचे घेतले निर्णय

लोकहिताचे निर्णय मार्गी लावण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीने सहकाऱ्यांनी केला. लोकहिताला प्राधान्य देण्यात आलं. शाश्वत विकासाचे काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरीही राज्यात महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही, असे अजितदादा म्हणाले. त्यांनी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्याबदद्ल अभिनंदन केले.

समन्वयाच्या अभावाचा बसला फटका

लोकसभेतील पराभवाचे खापर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर फोडले होते. त्यांनी संविधान आणि इतर गोष्टींचा गैरसमज पसरवल्याने महायुतीचा पराभव झाल्याचे बोलले जात होते. पण अजितदादांनी महायुतीला पण आत्मचिंतन करायला लावले. त्यांनी महायुतीचा पराभव कशामुळे झाला, याचे झणझणीत अंजनच महायुतीच्या डोळ्यात घातले.

विभागनिहाय, जिल्हानिहाय, तालुकानिहाय समन्वय साधण्याचं ठरवलं होतं प ते झालं नाही. महायुतीत समन्वय राखण्यात अपयश आल्याची अजित पवारांची जाहीर कबुली अजितदादांनी या मेळाव्यात बोलताना दिली. विरोधकांनी पसरविलेला गैरसमज हाणून पाडण्याचं काम आपण केलं पाहिजे. आता समन्वय राखण्यासाठी लगेच कामाला लागू, असे आवाहन अजितदादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले. विधानसभेपूर्वी चुका दुरुस्त करण्याचे मोठे काम महायुतीला करावे लागणार असल्याचे संकेतच जणू त्यांनी दिले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;