महिला टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

महिला टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्य सरकार महिलांसाठी नवनवीन योजना आणत आहे. राज्यभरात लेक लाडकी, मुख्यमंत्री लाडकी बहीण, बस प्रवासात 50% सवलत, शैक्षणिक सुविधा, आर्थिक महामंडळ सखी, बचत गट, महिला सक्षमीकरण या योजना दिल्यावर आता मुंबई विमानतळावर महिला खाजगी टॅक्सी चालकांसाठी आनंदाची बातमी आहे.

महिला टॅक्सी चालकांसाना तासनतास ग्राहकांची वाट पाहत ताटकळत राहवं लागू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय घेतला आहे. विमानतळावर महिलांना मिळणार हक्काचे पार्किंग, दर चार टॅक्सी नंतर एक महिला टॅक्सी असे नियोजन असणार आहे. तर येत्या काही दिवसातच एअरपोर्ट अंतर्गत महिला टॅक्सी कर्मचाऱ्यांसाठी एक स्वतंत्र कक्ष ऊभारण्यात येणार आहे. त्यामुळे टॅक्सी चालक महिलांना यामुळे मिळणार मोठा दिलासा मिळणार आहे.

लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची माहिती

लाभार्थी महिलेचे वय 21 वर्षे पूर्ण झालेले असावे. 65 वर्षापर्यंतच्या महिलांनाच त्याचा लाभ घेता येईल. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावी. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे. लाभार्थी महिलेचे बँकेत खाते असायला हवं. या योजनेसाठी पुढील कागदपत्रे लागणार आहेत. ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. पासपोर्ट आकाराचा फोटो. रेशनकार्ड आणि योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

अर्जदाराने संपूर्ण भरलेला अर्ज संबंधित अंगणवाडी केंद्रावर जमा करायचा आहे. सेतू सुविधा केंद्रावरही आपण अर्ज जमा करू शकता. राज्यभरातील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रांवर महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;