महाविकास आघाडीच्या बैठकीतली आतली बातमी, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठं काहीतरी घडणार?

महाविकास आघाडीच्या बैठकीतली आतली बातमी, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठं काहीतरी घडणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडी आगामी काळात नेमक्या कुठपर्यंत जातील? ते आगामी काळात स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे आगामी काळ हा महत्त्वाचा असणार आहे. कारण राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी राजकारणात पडद्यामागे जोरदार हालचाली सुरु आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. या बैठकीतील आतली बातमी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चांगलं यश आलं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही तसंच यश मिळवण्यासाठी महाविकास आघाडी आता प्रयत्न करणार आहे. त्याच अनुषंगाने मविआ नेत्यांची आज चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

  • 12 जुलैला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव व्हावी यासाठी काही महत्त्वाच्या नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली आहे. विधान परिषद सोबत विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच जागावाटप संदर्भात चर्चा सुरू केल्या जातील. जागावाटप संदर्भात प्राथमिक चर्चा या बैठकीत झाली.
  • लवकरच राज्यभरातील तीनही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मुंबईत मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा म्हणजे एकप्रकारे भव्य सभा असेल, ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे यश महाविकास आघाडीला मिळालं त्याबद्दल मतदारांचे धन्यवाद मानले जाईल, आणि विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल, असं आजच्या बैठकीत ठरलं.
  • येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जात असताना कोणत्या मुद्द्यांवर मतदारांसमोर जायचं? या विषयावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. महाविकास आघाडीचा नेमका जाहीरनामा कसा असेल? कोणते मुद्दे प्रचारात विधानसभेच्या महत्त्वाचे ठरतील या सगळ्या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली.
  • महाविकास आघाडी म्हणून तीन पक्ष आणि इतर घटक पक्ष यांची जिल्हा स्तरावर एकजूट निर्माण होऊन निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सभा मेळाव्यांचा आयोजन केले जाणार आहे. महाविकास आघाडी मिळून एकत्रित लढल्यास आपण लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सुद्धा चांगलं यश मिळवू शकतो हा विश्वास तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. जागावाटपसंदर्भातील बैठकांना सुद्धा लवकरच सुरुवात केली जाणार असून जागा वाटपाच्या सूत्रसंदर्भात सुद्धा निर्णय घेतला जाईल, असं आजच्या बैठकीत ठरलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;