टी20 वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियातील चार मुंबईकर खेळाडूंचा सत्कार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव

टी20 वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियातील चार मुंबईकर खेळाडूंचा सत्कार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव

टीम इंडियाने 11 वर्षानंतर आयसीसी चषकावर नाव कोरलं. तसेच 17 वर्षानंतर टी20 वर्ल्डकप भारताने जिंकला आहे. विजयानंतर टीम इंडिया भारतात पोहोचली तेव्हा त्यांनी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईच्या चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यात कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांचा समावेश आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी विश्व विजेत्या टीम इंडियातील 4 खेळाडूंनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली. या सत्कारानंतर हे 4 खेळाडू विधानभवनात जाणार आहेत. विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये सत्कार होणार आहे. त्यासाठी विधानभवनात लोककलाकार जमले आहेत. विधानभवनात मुंबईकर खेळाडूंचं तुतारी वाजवून स्वागत केलं जाणार आहे. तसेच राज्य सरकारने 4 मुंबईकर खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.

रोहित शर्माने संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेत आक्रमक शैलीने विरोधी संघांना घाम फोडला होता. तर सूर्यकुमार यादवला खेळपट्टीवर पाहून गोलंदाजांची भंबेरी उडत होती. तसेच सूर्यकुमार यादवने शेवटच्या षटकात पकडलेला झेल कायमचा स्मरणात राहणारा आहे. कारण हा झेल पकडताना एक चूक झाली असती तर सामना गमवण्याची वेळ आली असती. शिवम दुबेनेही मधल्या फळीत टीम इंडियाला मोलाची साथ दिली. यशस्वी जयस्वालला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. पण त्याचं संघात असणंही खूप महत्त्वाचं होतं. एखादा खेळाडू जखमी झाला असता तर त्याची जागा भरून काढता आली असती.

टी20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेचा 7 धावांनी धुव्वा उडवला. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत धाकधूक वाढवणारा ठरला. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर डेविड मिलरने मारलेला उत्तुंग फटका पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली होती. सिक्स जाऊ नये अशीच सर्वांची भावना होती. पण सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेतला आणि सामना भारताच्या पारड्यात पडला. सहा महिन्यांआधी टीम इंडियाला वनडे वर्ल्डकप जिंकण्याची संधी चालून आली होती. मात्र ऑस्ट्रेलियाने विजयरथ अडवला आणि स्वप्न भंगलं होतं. मात्र आता ही कसर टी20 वर्ल्डकप जिंकून काढण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;