मुंबईत व्हिक्ट्री परेडमध्ये किती लाख चाहते आले? आकडा वाचून आश्चर्य वाटेल

मुंबईत व्हिक्ट्री परेडमध्ये किती लाख चाहते आले? आकडा वाचून आश्चर्य वाटेल

टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया आज मुंबईत दाखल झाली. टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईत आज जंगी विजयी यात्रा काढण्यात आली. लाखो चाहते या विजयी यात्रेत सहभागी झाले. मुंबईच्या नरिमन पॉईंट पासून ते वानखेडे स्टेडियम अशी टीम इंडियाची विजयी यात्रा निघाली. टीम इंडियाचे खेळाडू ओपन रुफ बसमधून स्टेडियमच्या दिशेने गेले. यावेळी मरीन ड्राईव्ह परिसरात लाखो क्रिकेट चाहते जमलेले होते. या सर्व चाहत्यांनी मोठ्या उत्साहात, घोषणाबाजी करत टीम इंडियाच्या खेळाडूंचं स्वागत केलं. अनेक जण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात आवडत्या खेळाडूंचे फोटो आणि व्हिडीओ काढताना दिसले. ही मिरवणूक जवळपास 2.2 किमीची होती. या दरम्यान मरीन ड्राईव्ह परिसरात उसळलेली गर्दी ही जवळपास 3 लाखापेक्षा जास्त होती, अशी माहिती आता समोर येत आहे.

मरीन ड्राईव्ह परिसरात आज दुपारपासून क्रिकेट प्रेमींची गर्दी जमायला सुरुवात झाली होती. आपल्या आवडत्या टीम इंडियाची एक झलक पाहण्यासाठी इथे लाखो चाहते अनेक तासांपासून वाट पाहत उभे होते. यामध्ये तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. मरीन ड्राईव्ह परिसरात उसळलेली गर्दी पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतर्क झाले. त्यांनी तातडीने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना फोन करत गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे तसेच गर्दीचं नियोजन करण्याचे आदेश दिले. एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांना गर्दीत काळजी घेण्याचं आणि पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील तेच आवाहन मुंबईकरांना केलं.

रुग्णवाहिकेसाठी करुन दिली मोकळी वाट

या विजयी मिरवणुकीच्या दरम्यान काही संवेदनशील गोष्टी देखील बघायला मिळाल्या. मुंबईकरांच्या हळव्या आणि संवेदनशील मनाची प्रचिती या निमित्ताने आली. विजयी मिरवणूक सुरु होण्याआधी मरीन ड्राईव्ह परिसरात एक रुग्णावाहिका भर गर्दीतून जाताना दिसली. विशेष म्हणजे मुंगीलादेखील जायला जागा नाही इतका मोठा जनसागर तिथे लोटला होता. पण या जनसागराने रुग्णवाहिकेसाठी वाट मोकळी करुन दिली. अवघ्या काही मिनिटात ही रुग्णवाहिका गर्दी पार करुन आपल्या मार्गाला गेली. गर्दीतल्या रुग्णवाहिकेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;