नवाब मलिक अजित दादांच्या बैठकीत, फडणवीसांच्या विरोधाचं काय?

नवाब मलिक अजित दादांच्या बैठकीत, फडणवीसांच्या विरोधाचं काय?

अजित पवारांच्या बैठकीत, नवाब मलिकांनी हजेरी लावली आणि पुन्हा मलिक अजित पवारांच्याच राष्ट्रवादीसोबत आहेत का ?, अशी चर्चा सुरु झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात अजित पवारांनी बैठक घेतली. त्या बैठकीला मलिकही उपस्थित होते. आता मलिकांवरुन भुवया उंचावण्याचं कारण म्हणजे भाजप, विशेषत: फडणवीसांचा विरोध…फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून मलिकांना सोबत घेण्यास विरोध असल्याचं म्हटलं होतं मात्र कालच्या बैठकीनंतर दादांनी विधान भवनात येताना 3 शब्दांची प्रतिक्रिया दिली.

तुम्हाला त्रास होतोय का ?…अजित पवारांच्या या प्रतिक्रियेवरुन हे स्पष्ट झालं की मलिक अजित पवारांसोबत आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते मिटकरींनीही नवाब मलिक आमच्याच सोबत असल्याचं म्हटलंय. मात्र भाजपकडून मंत्री मुनगंटीवारांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की, मलिकांना महायुतीचा भाग करण्यास विरोधच आहे. भाजपच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंधित जमीन प्रकरणात, फडणवीसांनी मलिकांवर आरोप केले होते. ज्यानंतर ईडीचीही कारवाई झाली आणि 15 महिने मलिक जेलमध्ये होते. तब्येतीच्या कारणास्तव त्यांना जामीन मिळाला. आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर बसून मलिकांनी आपण अजित पवारांसोबत असल्याचं कृतीतून दाखवून दिलं. त्यानंतर तात्काळ फडणवीसांनी पत्र लिहून मलिकांना विरोध केला होता.

सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. मलिकांवरील आरोप सिद्ध न झाल्यास त्यांचे आपण जरुर स्वागत करावे. मात्र आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे हे योग्य होणार नाही, हे आमचे स्पष्ट मत आहे. मलिकांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली. तरीही त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 2 उमेदवार देण्यात आलेत. मतांचा कोटा 23 आमदारांचा आहे, त्यामुळं दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी दादांना एक एक मतांची गरज आहे…मलिक हे दादांच्याच राष्ट्रवादीचे मतदार असतील हे त्यांच्या बैठकीतल्या हजेरीवरुन क्लीअर झालं.

भाजपनं आपली भूमिका अजूनही तीच असल्याचं म्हटलं..पण शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची अडचण झाल्याचं दिसतंय..वरिष्ठ निर्णय घेतील असं प्रताप सरनाईक म्हणालेत.

मलिकांनी स्वत:हून आपण शरद पवारांसोबत की अजित पवारांसोबत हे जाहीर केलेलं नाही. मात्र आपल्या कृतीतून त्यांनी पुन्हा एकदा अजित पवारांसोबतच असल्याचं दाखवून दिलंय. अर्थात फडणवीसांची प्रतिक्रिया त्यावर आलेली नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;