उंचच उंच इमारतीत चढायचा, नाकीनऊ आणायचा, अखेर स्पायडर मॅन चोर सापडला! मुंबई पोलिसांना चक्रावून सोडणारा चोरटा गजाआड

उंचच उंच इमारतीत चढायचा, नाकीनऊ आणायचा, अखेर स्पायडर मॅन चोर सापडला! मुंबई पोलिसांना चक्रावून सोडणारा चोरटा गजाआड

स्पायडर मॅन आपण चित्रपटात पाहिला आहे. विशेष म्हणजे लहान मुलांना स्पायडर मॅन चित्रपट खूप आवडतो. चित्रपटातील स्पायडर मॅन हा हिरो असतो. तो जगातल्या चुकीच्या आणि नकारात्मक गोष्टींना दूर करण्यासाठी प्रयत्न करतो. तो दृष्ट लोकांना नष्ट करतो. सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात कोणतंही संकट येऊ नये यासाठी काळजी घेतो. सारं काही आलबेल राहावं यासाठी काळजी घेतो. याशिवाय तो स्वत:चं वैयक्तिक आयुष्यदेखील जगतो. हे झालं चित्रपटातल्या स्पायडर मॅनचं कॅरेक्टर. पण मुंबईत स्पायडर मॅन स्टाईलमध्ये शहरातील उंच इमारतींवर चढून चोरी करणाऱ्या तथाकथिक स्पायडर मॅनला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा स्पायडर मॅन उंच इमारतींवर पाईपच्या साहाय्याने चढायचा. तसेच संधी मिळेल त्या घरात घुसून जबर चोरी करायचा. त्याने या माध्यमातून 2 आठवड्यात तब्बल 11 ठिकाणी चोरीदेखील केली.

आरोपी स्पायडर मॅनचा चोरीचा हा प्रकार चक्रावून सोडणारा आहे. त्याला वाटलं आपल्यापर्यंत कोणी पोहोचू शकत नाही. पण कानून के हात लंबे होते हैं हे त्याला कदाचित माहिती नसावं. त्यामुळे त्याच्या नांग्या ठेचण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांना एका इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा चांगला फायदा झाला. पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या दोन साथीदारांनादेखील अटक केली आहे.

सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याच्या घरी लाखोंची चोरी

मुंबईतील कांदिवली पोलिसांनी अशा एका चोरट्याला अटक केली आहे, जो मुंबईतील उंच इमारतींमध्ये पाईपद्वारे चढायचा आणि तो घरातून चोरी करून पळून जायचा. आरोपी स्पायडर मॅनने 2 आठवड्यात मुंबई उपनगरात पाईपवर चढून 11 चोरी केल्या आहेत. कांदिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “आरोपी संतोष चौधरी उर्फ वैतू हा 11 जूनला रात्री 11 ते पहाटे 4 च्या दरम्यान कांदिवली पश्चिमेतील नमन टॉवर येथे राहणारे सेवानिवृत्त बँक अधिकारी अरुण शहा यांच्या तिसऱ्या मजल्यावरील घरी पाईपच्या सहाय्याने चढला. तिथून तो लाखो रुपयांची रोकड आणि दागिने असा एकूण 3 लाख 44 हजार रुपयांचा ऐवज चोरून पळून गेला होता”, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी दिली.

कांदिवली पोलिसांनी मुख्य आरोपी संतोष चौधरी उर्फ वैतू आणि त्याचे दोन साथीदार रजब खान, देव बनिया या दोघांनादेखील अटक केली आहे. आरोपींनी दोन आठवड्यात बोरिवली, MHB, कांदिवली आणि गोरेगाव परिसरातील तब्बल 11 ठिकाणी चोरी केली आहे. यापूर्वी देखील आरोपींच्या विरोधात 8 चोरीचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सीसीटीटीव्हीच्या साहाय्याने आरोपींना गजाआड केलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;