Salman Khan : सिद्धू मुसेवालाप्रमाणेच सलमान खानचा ‘गेम’; दोषारोपपत्रात धक्कादायक खुलासे

Salman Khan : सिद्धू मुसेवालाप्रमाणेच सलमान खानचा ‘गेम’; दोषारोपपत्रात धक्कादायक खुलासे

बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खानला मारण्याचा कट रचण्यात आला होता. सतर्कतेमुळे वेळीच काही आरोपींच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश आले. ईदच्या एक दिवसानंतर त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर फायरिंग करण्यात आले होते. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली होती. त्यानंतर भाईजानला अनेकदा मारण्याच्या धमक्या आल्या. नवी मुंबई पोलिसांनी प्रकरणात 350 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. काय आहे या चार्जशीटमध्ये?

मुंबई पोलिसांचा फिल्मी अंदाज

सलमान खान याच्यावर गोळीबार करण्यासाठी बिश्नोई गँगचे दोन गट सक्रिय होते. यामध्ये एका गटाने सलमानच्या घरावर गोळीबार केला. तर दुसरा गट हा त्याच्या फॉर्म हाऊसवर पाळत ठेऊन होता. त्यावर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांनी झाडाझडतीसाठी एकदम फिल्मी स्टाईल वापरली. त्यांनी बिश्नोई गँगमध्येच त्यांचा खास माणूस घुसवला. या माणसाने या गटाच्या सर्व हालचाली पोलिसांपर्यंत पोहचवल्या. चोरावरच नवी मुंबई पोलीस मोर झाले. ही गँग कशासाठी आली हे समजताच पोलिसांनी त्यांना अटक केली. सलमानच्या वॉटेंड या चित्रपटासारखी ही कथा होती.

दोषारोपपत्रात नेमकं काय?

अभिनेता सलमान खान याची हत्या घडविण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगने पाकिस्तानातून AK-47 रायफल मागवल्या होत्या. पनवेल पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपत्रात असे अनेक खुलासे करण्यात आले आहे. सलमान खान याला सिद्धु मुसेवाला याच्या प्रमाणेच मारण्याची तयारी होती. शुटिंगदरम्यान अथवा पनवेल येथील फार्महाऊसवर सलमान खानला मारण्याची तयारी करण्यात आली होती. याविषयीची सर्व माहिती चार्जशीटमध्ये करण्यात आली आहे.

25 लाखांची दिली होती सुपारी

पनवेल पोलिसांच्या दाव्यानुसार, लॉरेन्स बिश्नोईने सलमान खान याच्यावर हल्ल्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी दिली होती. पोलिसांनी या दोषारोपपत्रात गु्प्तहेर खात्याची माहिती, आरोपींचे मोबाईल फोन, त्यातील संभाषण, तांत्रिक माहिती, WhatsApp ग्रुप, टॉवर लोकेशन आणि ऑडिओ-व्हिडिओ कॉल्स आधारे पुरावे गोळा केले आहेत. त्याआधारे 350 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

काय आहेत आरोपींची नावे

धनंजय तापसिंह उर्फ अजय कश्यप (28), गौतम विनोद भाटिया (29), वासपी महमूद खान उर्फ चीना (36), रिझवान हसन उर्फ जावेद खान (25), आणि दीपक हवासिंह उर्फ जॉन वाल्मिकी (30) अशी या गटातील आरोपींची नावे आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;