‘मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची’, मुंबई पदवीधर मतदारसंघात विजय मिळताच अनिल परब कडाडले

‘मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची’, मुंबई पदवीधर मतदारसंघात विजय मिळताच अनिल परब कडाडले

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचा विजय झाला. या विजयानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत आपली पहिली प्रतिक्रिया दिली. “मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीत मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून विजयी झालोय. माझे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी माझ्या विजयासाठी आणि माझ्या असंख्य शिवसैनिकांनी मी निवडून यावं म्हणून अहोरात्र प्रयत्न केले. हा विजय माझ्या सर्व शिवसैनिकांचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे. हा विजय मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करत आहे. ज्या निष्ठेने सर्व मविआचे घटकपक्ष आणि शिवसैनिक लढले त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आमच्या सर्वांवर अशाचप्रकारे रहावा, अशी मी प्रार्थना करतो”, असं अनिल परब म्हणाले.

“आम्ही नेहमी घोषणा देतो, मुंबई आहे आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची. ही घोषणा आम्ही सत्य करुन दाखवली आहे. शिवसेना पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ असो, मुंबईत शिवसेनाच आहे. ती सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. शिक्षक मतदारसंघामध्येही विजयाच्या आम्ही अंतिम टप्प्यावर आहेत. मुंबईतील शिक्षक हे शिवसेनेसोबत आहेत हे सिद्ध झालं आहे. अधिकृत आकडेवारी सांगायची झाली तर मला 44 हजार 700 मते मिळाली आहेत. मी प्रतिस्पर्धीवर 26 हजार 26 मतांनी मात केली आहे. ही पदवीधर मतदारसंघामधील आजवरचा उच्चांक आहे”, असा दावा अनिल परब यांनी केला.

‘यावेळची निवडणूक शिवसैनिक रस्त्यावर उतरुन लढले’

“शिवसेनेचा हा ट्रेंड पदवीधर मतदारसंघात गेल्या 30 वर्षांपासून बघायला मिळतोय. पण यावेळची निवडणूक शिवसैनिक रस्त्यावर उतरुन लढले. ही निवडणूक फक्त माझी नाही तर प्रत्येक शिवसैनिकाची आहे, असं समजून शिवसैनिक रस्त्यावर उतरला आणि जिंकला म्हणून ही लढाई माझ्या हातात नव्हती, तर पक्षाचे कार्यकर्ते, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हातात होती. त्यांनीच मला विजयी केलं”, असं अनिल परब म्हणाले.

अनिल परब हे मुस्लिम मतदारांमुळे विजयी झाले?

यावेळी अनिल परब यांना सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. अनिल परब हे मुस्लिम मतदारांमुळे विजयी झाले, असा सत्ताधारी नेत्यांचा दावा आहे, त्यावर काय सांगाल? असा प्रश्न अनिल परब यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “आम्ही पदवीधर मतदारसंघाचा निकाल पाठवतो. यामध्ये किती मतदार हे मुस्लिम समाजाचे आहेत ते बघा. त्यानंतर मला हा प्रश्न विचारा”, असं अनिल परब म्हणाले. “उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील तीनही उमेदवार हे विजयी होतील आणि शिवसेनेचा डंका वाजेल ही मला खात्री आहे, आणि हा माझा विश्वास आहे”, असादेखील दावा अनिल परब यांनी केला.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;