Maharashtra Breaking News LIVE : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अडगावात दूध दरवाडीसाठी शेतकरी आक्रमक
आज विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज विधिमंडळात घाटकोपर हॉर्डिंग दुर्घटना प्रकरणात लक्षवेधी आहे आणि मदर डेअरी च्या प्रकरणात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. आज विधिमंडळात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अडगावात दूध दरवाडीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.दुधाला भाव वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. दूध रस्त्यावर ओतून देत निषेध केला. पुणे शहरात झिकाचा चौथा रुग्ण सापडला आहे. पुणे शहरात तिघांना झिकाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता मुंढवा भागात एका तरुणाला झिकाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्याची तब्येत चांगली असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. एरंडवणे येथे झिकाचे दोन रुग्ण आढळले तर मुंढवा भागात एका रुग्णाची नोंद झाली आहे.खासगी रुग्णालयाने ही माहिती महापालिकेला कळविण्यास विलंब केला,त्यामुळे त्या रुग्णालयास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List