मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची सर्वात मोठी बातमी! कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं मिळणार?

मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची सर्वात मोठी बातमी! कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं मिळणार?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्य सरकारचा रखडेला मंत्रिमंडळ विस्तार आता होण्याची शक्यता आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. पण आज अधिवेशनाचा पहिला दिवस उजाडला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालाच नाही. राज्य सरकारमधील अनेक आमदारांची मंत्रिपदासाठी आशा आहे. अनेकजण मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत आहे. या आमदारांचा विचार आता सरकार नक्कीच करणार आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिवेशनानंतर दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. तिथे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत एकनाथ शिंदे यांची चर्चा होईल. त्यानंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारातून राज्याला 14 नवे मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपला 6 ते 8 मंत्रीपदं, शिंदे गटाला 4 तर अजित पवार गटाला 2 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात प्रत्येक पक्षाकडून कुणाकुणाला संधी दिली जाते? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(सविस्तर बातमी लवकरच)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;